Close Visit Mhshetkari

7th Pay Arrears : खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या पगारात मिळणार सातवा वेतन आयोगाचा थकीत हप्ता शासन परिपत्रक निर्गमित

7th pay Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून आता कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारामध्ये सदरील थकीत हप्ता मिळणार आहे सविस्तर माहिती 

सातवा वेतन आयोग थकित हप्ता मिळणार

मा.शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेत्तर/ टि-५-६/२३-२४/६२६७, दिनांक २०/१२/२०२३

नुसार माहे डिसेंबर २०२३ चे ऑनलाईन देयक सातवा वेतन आयोगाच्या तिराऱ्या हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहे.

क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयके सादर न केल्याने सन २०२२-२३ मध्ये अदा करावयाचा राहिलेलासातव्या वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला ३ रा हप्ता अदा करणेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

State employees update

सातवा वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर २०२३ च्या वेतनासोबत अदा करणेसाठीचे आदेश आहेत.

मा. शिक्षण संचालक यांनी संदर्भिय पत्रात दिलेल्या निर्देशानुसार या विभागातील लेखाशीर्ष २२०२०४४२ व २२०२०४७८ या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर २०२३ चे वेतन देयक ७ वा वेतन आयोगाचा राहिलेला १ ला व २ रा हप्ता तसेच नियमित देय असलेला ३ रा हप्त्यासह अदा केरणेसाठी आपल्या मार्फत तात्काळ देयकामध्ये योग्य ते बदल करुन,अचूक वेतन देयक दिनांक २६/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यवाही करावी.

हे पण वाचा ~  7th pay arrears : सातवा वेतन आयोग थकित हप्ता, मेडिकल बील ऑनलाईन दाखल करण्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित ....

 

क्षेत्रिस स्तरावर तांत्रिक कारणास्तव/शाळांनी देयके सादर न केल्याने सन २०२१-२२ मध्ये करावयाचा राहीलेला सातव्या वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे. ७ व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे.

📑 सातवा वेतन आयोग थकित हप्ता शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👉 Pay commission Arrears 

सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता लेखाशिर्ष २२०२०१७३/३६ (जिल्हा परिषद शाळा), २२०२०२०८/३६ (खाजगी प्राथमिक शाळा व मनपा/नपा/नप/कटक मंडळे शाळा) या लेखाशिर्षामध्ये माहे डिसेंबर, २०२३ चे वेतन व सातव्या वेतन आयोगाचा राहीलेला १,२ व तसेच नियमित देय असलेला ३ रा हप्ता अदा करणेबाबत यथा नियम कार्यवाही करण्यात येईल.

उर्वरीत लेखाशिर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील. भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच ७ वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबधित विभागीय शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.

3 thoughts on “7th Pay Arrears : खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या पगारात मिळणार सातवा वेतन आयोगाचा थकीत हप्ता शासन परिपत्रक निर्गमित”

  1. कृपया कुठल्या विभागाशी संबंधित आहे ते Title मधे सविस्तर दिल्यास फसवणूक केल्यासारखे वाचकाना वाटणार नाही 🙏

    Reply
  2. जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा राहिलेले वेतन आयोगाचे फरक हप्ते कधी देण्यात येणार आहे

    Reply
  3. सरकार फक्त आश्वासन देत आहे, थकित हप्ते निवृत्तीधारक मेल्यावर देणार की काय ? असं वाटतं

    Reply

Leave a Comment