Close Visit Mhshetkari

Tax on PF Amount : भविष्य निर्वाह निधी संदर्भात नवीन आयकर नियम लागू! पहा किती करता येणार …

Tax on PF Amount : भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्दान आणि पेन्दान भोगी कल्याण विभाग) यांच्या संदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेन्वये, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा) १९६० मधील नियम क्रमांक ७, ८ व १० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

भविष्य निर्वाह निधी आयकर नियम

केंद्र शासनाच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक ८ मध्ये, “वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली,१९६२ च्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल” अशी सुधारणा दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे.

आयकर नियमावली,१९६२ मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सद्यस्थितीत रु. पाच लाख) अधिक नसावी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व मंत्रालय/विभागांना त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याबाबत देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मध्ये अधिसूचना दिनांक १८/०४/२०२३ नुसार सुधारणा केल्यावर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या धर्तीवर पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

हे पण वाचा ~  EPFO PENSION : ईपीएफो पेन्शन म्हणजे काय? फायदे काय असतात? जाणून घ्या सविस्तर माहिती

पीएफ आयकर नविन नियम

वर्गणीदाराची महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची वर्गणी जर रु. पाच लाखापेक्षा (नियमित वर्गणी + थकबाकी रक्कम मिळून) कमी जमा झालेली असेल तर त्या वित्तिय वर्षासाठी अशा वर्गणीदाराच्या बाबतीत उर्वरित महिन्यांसाठी वर्गणी जमा करताना एकूण वर्गणी रु. पाच लाखाच्या मर्यादेतच जमा करावी लागणार आहे.

उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६% प्रमाणे वर्गणी जमा केल्यानंतर सदर वर्गणीची रक्कम रु. पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर, उर्वरित महिन्यांची वर्गणी जमा करणे थांबवावे. अशा वर्गणीदारासाठी उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६% वर्गणी वजा करावयाची अट शिथिल करण्यात यावी.

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी उपरोक्त सूचना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या तसेच भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

Leave a Comment