Close Visit Mhshetkari

7th Pay Commission : मोठी बातमी ….. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 0 टक्के ? पहा काय आहे नवीन प्रणाली …

7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. डी.ए संदर्भात नवीन नियम लागू होण्याची शक्यता असून यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली होती.महागाई भत्ता संदर्भात काय आहे नवीन नियम ? पाहूया सविस्तर.

DA 50 % झाल्यास काय होईल ?

सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर डीए शून्यावर येणार आहे. थोडक्यात महागाई भत्त्याची गणना पुन्हा 0 पासून सुरू होईल,परंतू 50 % नुसार जी रक्कम मिळेल ती मूळ वेतनात विलीन केली जाणार आहे.सन 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारने महागाई भत्ता शून्यावर आणला होता.

DA Hike Merge Chart

महागाई भत्ता 50 % झाल्यास 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडली जाईल.समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18 हजार असेल तर त्याला 9 हजार DA मिळेल. परंतु, हा आता 50 % डीए नंतर मूळ पगारात जोडून शून्यावर आणला जाईल, म्हणजे मूळ वेतन 27 हजार रुपये होईल आणि डीए 0 % पासून गणला जाईल.

हे पण वाचा ~  7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ ?

महागाई भत्ता शून्य का केला जातो?

मित्रांनो जेव्हा नवीन वेतन आयोग लागू केली जाते तेव्हा,कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 100 % डीए झाल्यावर मूळ वेतनात जोडला जावा,परंतु ते शक्य नाही.यामुळे आर्थिक अडचण येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आले.

सन 2006 साली सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर पाचव्या वेतन आयोगाच्या डिसेंबर पर्यंत 187 % भत्ता दिला जात होता. नंतर संपूर्ण महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्यात आला होता. परिणामी सहाव्या वेतन आयोगाचा गुणांक 1.87 होता.

Leave a Comment