Close Visit Mhshetkari

Old Age Pension : खुशखबर ! आता ‘ या ‘ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाली जुनी पेन्शन योजना; शासन निर्णय निर्गमित….

Old Age Pension : वित्त विभागाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये, दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे.

सदरील योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक ७ जुलै, २००७ शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. संबधित शासन निर्णयातील परिच्छेद-२४ अनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास अथवा नियत वयोमान (यथास्थिती ५८ / ६० वर्षे), सेवात्याग केल्यास सेवान्त लाभ देण्यासंबंधीच्या तरतुदी स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू!

आता दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी शासन सेवेत कार्यरत असलेल्या व दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या निवृत्तीवेतनार्ह सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२ / २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत, केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर,राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा ~  Old pension : मोठी बातमी या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाली जुनी पेन्शन योजना ! शासन निर्णय निर्गमित

Old Age Pension Scheme

सदर शासन निर्णयातील परिच्छेद-६ अनुसार सदर कार्यपद्धती जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषित्तर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषि विद्यापिठे इत्यादींमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू असून, त्यानुसार दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील दिव्यांगांच्या १०० टक्के अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद मुलांची बालगृहे यांमधील १०० टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदर तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

Dcps/NPS Amounts Withdrawal

दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील दिव्यांगांच्या १०० टक्के अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद मुलांची बालगृहे यांमधील १०० टक्के अनुदानित पदांवरील ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत सोबत जोडलेल्या जोडपत्र-१ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

१) कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास,

२) कर्मचाऱ्याने नियम वयोमानापूर्वी (यथास्थिती ५८ / ६० वर्षे) सेवात्याग केल्यास, ३) कर्मचारी नियत वयोमानानुसार (यथास्थिती ५८ / ६० वर्षे) सेवानिवृत्त झाल्यास,

४) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास,

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणारी रक्कम परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील मान्यताप्राप्त व अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे अंशदान (स्तर-१) लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment