Close Visit Mhshetkari

Old Pension : आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणारे हे राज्य ठरले देशात सहावे ! कर्मचाऱ्यांना पेन्शन सह मिळणार हे लाभ …

Old Pension : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली, असून आपल्याला माहिती असेल की देशात यापूर्वी पंजाब, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश , कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे.

आता यामध्ये आणखी एका राज्याची भर पडलेली असून गुणोत्तर राज्याने सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्व पाहूया कोणत्याही राज्य आणि कशी होणार अंमलबजावणी?

Old Pension Scheme

मित्रांनो देशांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करणारे सिक्किम हे राज्य सहावे राज्य ठरले आहेत. आपल्याला माहिती असेल की सिक्किम हे राज्य पुर्वोतर भागांमध्ये सात राज्यांपैकी एक राज्य आहे.

सिक्कीम राज्य सरकारने दिनांक एक एप्रिल 2016 किंवा त्यानंतर सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच Nps बंद करून जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे.एनटीएस प्रणालीस कर्मचाऱ्याकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होता. परिणामी सरकारने कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊन ओल्ड पेन्शन स्कीम लागू केली आहे.

हे पण वाचा ~  Vehicle agrim : मोठी बातमी... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाहन खरेदी अग्रीम! शासन निर्णय निर्गमित

जुनी पेन्शन योजना होणार लागू

सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याकडून सिक्किम राज्यातील दिनांक 01 एप्रिल 2006 रोजी व त्यानंतर रुजु झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ लागु करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

सदरील निर्णयानुसार आता सिक्कीम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर मिळणारे इतर सर्व आर्थिक लाभ लागु करण्यात आलेले आहेत.

कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत

यासोबतच राज्यातील कंटाळाची व रोजंदरी कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठा लाभ मिळणारा असून सिक्कीम राज्यातील आता कंट्रातील कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेली आहे किमान वेतन धोरणानुसार त्यांना आता वेतन देण्यात येणार आहे.

आता सिक्कीम सारख्या छोट्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अशा पल्लवीत झालेल्या आहे.

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना कधी लागू करणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रगतिशील राज्य असल्यावर सुद्धा जुनी पेन्शन योजना का लागू करण्यात येत नाही ? अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment