Close Visit Mhshetkari

Old pension news : महाराष्ट्रातील जुनी पेन्शन संपासोबत चालू असलेल्या ‘या’ अंदोलक कर्मचाऱ्यांना मिळाली जुनी पेन्शन

OlOld pension : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता.अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला होता, महाराष्ट्रातील जुनी पेन्शन अंदोलन बरोबर फ्रान्स मध्ये सुद्धा अंदोलन चालू होते. पण तेथील कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे.

Old pension latest news

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशभरात तीव्र विरोध असतानाही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याच्या पेन्शन विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.फ्रान्सच्या संवैधानिक परिषदेने शुक्रवारी प्रमुख सेवानिवृत्ती-वय कायद्याला मंजुरी दिली आहे.

मॅक्रॉन यांनी पेन्शन विधेयकावर स्वाक्षरी

फ्रान्सच्या संवैधानिक परिषदेने शुक्रवारी एक प्रमुख सेवानिवृत्ती-वय कायद्याला मंजुरी दिली, परंतु कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी देशात अनेक महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत. फ्रान्सच्या नऊ सदस्यीय संवैधानिक परिषदेने सादर केलेला प्रस्ताव,निवृत्तीचे वय वाढवण्याचा तसेच आवश्यक नोकरीच्या वर्षांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो.हे विधेयक फ्रेंच कायद्याचे पालन करते असे परिषदेला आढळून आले आहे.

पेन्शनसाठी ४३ वर्षे सेवा आवश्यक

पेन्शन सुधारणा योजनेतील काही भाग फ्रान्सच्या नऊ सदस्यीय घटना परिषदेने इतर 6 प्रस्तावांसह नाकारले आहेत. टाकण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी एक म्हणजे 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किती लोकांना ते नोकरी देतात याची माहिती कंपन्या प्रकाशित करणार नाहीत. 

हे पण वाचा ~  Old age pension कमी चालेल, पण पेन्शन हवीच! रक्कम निश्चित करण्याची राज्यांची मागणी

पेन्शन विधेयकांतर्गत पूर्ण पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या किमान सेवा कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. 

2027 पासून लोकांना पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी एकूण 43 वर्षे काम करावे लागेल. तर आतापर्यंत किमान सेवा कालावधी केवळ 42 वर्षे होता.

विधेयका विरोधात आंदोलन सुरूच राहणार!

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सेवानिवृत्तीचे वय 64 पर्यंत वाढवण्याच्या योजनेचा निषेध केला जातो आहे.फ्रान्समधील शहरे आणि गावांमध्ये मोर्चा काढला जात आहे.1 मे रोजी कामगार दिनानिमित्त या योजनेच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.

विधेयक मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे.फ्रान्स आणि मॅक्रॉनमध्ये सामाजिक तणाव वाढवणा-या पेन्शन सुधारणां विधेयकाच्या विरोधात फ्रेंच नागरिक काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

Juni pension yojana Maharashtra

आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुध्दा जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही हे पाहणे सुध्दा औत्सुक्याचे ठरणार आहे 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment