Health insurance : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून गेल्या दहा वर्षापासून रखडलेली मागणी आता पूर्ण होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Employees Health insurance
मित्रांनो सांगायचं झालं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी कर्मचारी यांना आता धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्या सुटण्यास मदत झालेली आहे.
महापालिकेतील अन्यसंवर्गातील कर्मचाऱ्यांना आरोग्य धन्वंतरी योजनेचा लाभ मिळत होता परंतु शिक्षण विभागातील जे सरकारी कर्मचारी आहे.ज्यामध्ये प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेले होते.
धन्वंतरी स्वास्थ योजना
सदरील योजना सरसकट शिक्षक संवर्गाला सुद्धा लागू करावी यासंदर्भात शिक्षक संघटनांनी अग्रई भूमिका घेतली होती याबाबत पालिका आयुक्त शेखर शिंग यांनी बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा सूचना आमदार महेश लांडगे आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रशासनाला केली होती.
शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक घेण्यात आली होती.पालिकेच्या इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी ३०० रुपये आणि सेवानिवृत्त शिक्षकांकडून १५० रुपये मासिक सभासद वर्गणी म्हणून कपात केली जाईल.सदरील योजनेत कर्मचाऱ्यांना ‘धन्वंतरी योजने’चा लाभ देण्याचा अंतिम निर्णय बैठकीत घेण्यात आला.