State employees : धक्कादायक… या कर्मचाऱ्यांचे वयाच्या ५०/५५ वर्षी होणार सेवा पुनर्विलोकन ! शासन निर्णय निर्गमित

State Employees : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम १० (४) व नियम ६२ नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना , वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा, यापैकी जे अगोदर घडेल, त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करुन त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे.

कर्मचाऱ्यांचे होणार सेवा पुनर्विलोकन

परिवहन विभागातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या ५० / ५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे आगोदर घडेल त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करण्यात येणार आहे.

विहित प्रस्ताव प्रधान सचिव (परिवहन) यांचे अध्यक्षतेखालील विभागीय पुनर्विलोकन समितीच्या दिनांक १७.०८.२०२३ रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. 

विभागीय पुनर्विलोकन समितीने सदर अधिकान्यांच्या सेवेचे मुल्यमापन करून केलेल्या शिफारशीनुसार ज्या अधिकान्यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठरविले आहे. त्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Dearness allowance : मोठी बातमी.. आता 'या' कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 4% वाढ! वेतन आयोग फरक, सण अग्रीम पण..

State employees service GR

सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयान्वये सेवा पुनर्विलोकनासंबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित केल्या आहेत. याद्वारे परिवहन विभागातील यांच्या सेवा पुनर्विलोकनाकरिता दि. ०२.०८.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव (परिवहन) यांचे अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या संवर्गातील पदासाठी नियम?

१) गट- अ (राजपत्रित) (वरिष्ठ वेतनश्रेणी) ग्रेड वेतन रु. ७६००/- व त्यापेक्षा अधिक परंतु रु.१००००/- पेक्षा कमी संवर्गातील अधिकारी

२) गट-अ (राजपत्रित) (कनिष्ठ वेतनश्रेणी) ग्रेड वेतन रु.७६००/- पेक्षा कमी संवर्गातील अधिकारी

३) गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकारी

सरकारी कर्मचारी सेवा पुनर्विलोकन शासन निर्णय येथे पहा – सेवा पुनर्विलोकन

Leave a Comment