Retirement age : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट्स महाराष्ट्र विधिमंडळातून हाती आली आहे. पाहूया सविस्तर माहिती
विधानसभा सेवानिवृत्ती वय – तारांकित प्रश्न
विधिमंडळ सदस्य श्री.विलास पोतनीस, श्री. सुनिल शिंदे यांच्या कडून सन्माननीय उप मुख्यमंत्री यांच्याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याबाबत खुलासा करवा,असा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धक्कादायक उत्तर प्राप्त झालेले आहे.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे लेखी निवेदनाद्वारे दिनांक १७ मे, २०२३ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय?
a)असल्यास, उक्त प्रकरणी मागणीच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली?
b)वा करण्यात येत आहे?
c) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
विधानसभा सेवानिवृत्ती वय – तारांकित प्रश्न उत्तर
श्री. अजित पवार यांच्या कडून खालील उत्तर प्राप्त झाले आहे
a) होय, हे खरे आहे.
b) उक्त मागणीबाबत अद्याप शासन स्तरावर निर्णय घेण्यातआलेला नाही.
c) प्रश्न उदभवत नाही.
Employees Retirement Age
केंद्र सरकार तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय , 60 वर्षे करण्यात आलेले आहे.महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृतीचे वय केंद्र व भारतीय प्रशासकीय सेवेप्रमाणे 60 वर्ष करण्याबाबात राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे.
कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय वाढीसाठी अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्ती सनदी अधिकारी बी. सी.खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय समिती नियुक्त केलेलली आहे.
कर्मचारी सेवानिवृत्त वय 60 वर्ष
महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाने देखील प्रस्ताव सादर केला होता,परंतु या प्रस्तावाला अतिरिक्त मुख्य सचिवांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबीत आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्य सरकारी बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती पण या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.