Close Visit Mhshetkari

Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय 60 वर्षे संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! पहा सविस्तर

Retirement age : शिंदे – पवार- फडणवीस सरकारकडून महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असून शासनाकडून या मागणीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार! 

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृती वयाच्या बाबतीत खूप दिवसापासून मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ही महत्वाची मागणी होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत आश्वासन दिले होते.सध्या IAS/IPS आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय यापूर्वीच 60 केलेले आहे.

पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार

सेवा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना 14 लाखापर्यंत Gratuity रक्कम द्यावी लागतो. जवळपास 60 हजार कर्मचाऱ्यांसाठी सरकारवर दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.सेवा निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास सरकारचे दरवर्षी 4 हजार कोटी रुपये वाचणार आहे.

हे पण वाचा ~  Employees arrears : मोठी बातमी.. या कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत हप्त्यासह वेतन अनुदान!शासन निर्णय निर्गमित..

Employees Retirement Age

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 17 लाख आहेत. त्यातील दरवर्षी जवळपास 3% राज्य कर्मचारी सेवा निवृत्त होतात.राज्य शासन सेवेत नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे असल्याने बऱ्याच राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल अत्यंत कमी मिळतो.

आता सन 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे – फडणवीस – पवार सरकार निश्चितच हा निर्णय घेऊ शकते असे काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

4 thoughts on “Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय 60 वर्षे संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! पहा सविस्तर”

  1. आंदोलना दरम्यान जे निवृत्त झाले आहेत, ते पण सहभागी झाले होते निर्णय उशिरा लागत आहे तरी आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा पासून सर्वांना कामावर रुजू करून घ्यावे ही विनंती.
    ज्यांना अजून दोन वर्ष अतिरिक्त सेवा करण्याची संधी द्यावी

    Reply
    • किंवा त्यांना दोन वर्षाचे संपूर्ण वेतन लाभ वेतनवाढ व इतर सर्व लाभ देण्यात यावे दोन वर्षे सेवानिवृत्त तर वाढ झाल्यास वरील मागणी करावी

      Reply
    • एकदम बरोबर, जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सेवेत सामावून घेतले जावे.

      Reply

Leave a Comment