Close Visit Mhshetkari

State employees : सेवा अंतर्गत परिक्षा वय सुट व शासन सेवेत समावेश करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचे दोन शासन निर्णय निर्गमित..

State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले असून दोन्ही शासन निर्णयाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे.पहिला जो शासन निर्णय आहे तो नगरपरिषद कर्मचारी तर दुसरा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे; तर बघूया सविस्तर माहिती

सेवा अंतर्गत परिक्षेसाठी कमाल वय सुट

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ सेवांतर्गत वैद्यकीय अधिकान्यांसाठी (In Service Medical Officers) पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुधारित निवड नियमावली शासन निर्णय दि. १९ मार्च, २०१९ मधील तरतुदीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ( NEET PG) प्रवेशपरीक्षेच्या दिनांकास ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे अशी अट आहे.

कोरोना जागतिक महामारीमध्ये राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी यांनी अहोरात्र रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचारात्मक सेवा दिलेल्या होत्या. त्यांनी कर्तव्यभावनेने कोरोना काळात कवि योध्दा म्हणून अहोरात्र काम केले. सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची इच्छा असतानाही सन २०२० व सन २०२१ मधील कोरोना महामारी परिस्थितीमुळे NEET पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेकरीता आवश्यक तयारी करता आली नाही. 

आरोग्य विभागातील सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी NEET PG २०२३ या पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता वयाच्या अटीमध्ये शिथिलता मिळणेबाबत विनंती केलीआहे. सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांचेकरीताही सन २०२० व सन २०२१ मधील कोविड परिस्थिती विचारात घेता NEET PG-२०२२ व NEET PG-२०२३ या पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेकरीता कमाल वयोमर्यादेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.NEET PG २०२३ या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेकरीता कमाल वयोमर्यादेची अट “एक वेळची विशेष बाब ” म्हणून शिथिल करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Juni Pension : खुशखबर ! " या" राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना ; अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ...

शासन सेवेत सामावून जुनी पेन्शन योजना लागू

इचलकरंजी नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मधील ४२ अधिकारी / कर्मचारी यांना समक्रमांकाच्या दि. १०/०८/२०२२ रोजीच्या आदेशान्वये शासन सेवेत समावेशनाच्या दिनांकापासून “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” लागू करण्याबाबतचा उपरोक्त दिनांक १०/०८/२०२२ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामधील ४२ अधिकारी / कर्मचारी यांना “महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्ती विषयक) अधिनियम,१९८१ नुसार त्यांची यापूर्वीची सेवा विचारात घेऊन “जुनी पेन्शन योजना” लागू राहील.

समावेशित अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांचा यापूर्वीचा सेवा कालावधी हा शासनाच्या प्रचलित नियमानुसार रजा, आश्वासित प्रगती योजना व अन्य लाभाकरीता अनुज्ञेय राहील.समावेशित अधिकारी / कर्मचान्यांना दिनांक ०१/०५/२०१२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहिल.

सरकारी कर्मचारी आजचे शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👉 सरकारी कर्मचारी अपडेट्स

Leave a Comment