Close Visit Mhshetkari

Retirement planning : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, ‘या’ 3 ठिकाणची गुंतवणूक पडेल उपयोगी …. 

Retirement planning : मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि नवीन वर्षाचा आर्थिक नियोजन करण्यासाठी अत्यंत उत्तम वेळ आता आहे आता जर तुमचं वर 30 ते 40 वर्षापर्यंत असेल तर आत्तापासूनच निवृत्तीचं प्लॅनिंग आपण करून ठेवायला हवे आहे.अनेक प्रोफेशनल व्यक्ती आर्थिक नियोजनात निवृत्तीचे टार्गेट ठेवत नाहीत. पण या वर्षी तुम्ही एक गोष्ट दुरुस्त करू शकता.

तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती निधीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आणि धोरण अवलंबल्यास, गुंतवणुकीसाठी अनेक चांगले पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 

  • वॉलेंटरी प्रोविडेंट फंड (VPF)
  • ईएलएसएस (ELSS)
  • पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF)

Voluntary Provident Fund

वॉलेंटरी प्रोविडेंट फंड म्हणजे जर कर्मचार्‍याने आपला पगार कमी ठेवून भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान वाढवले, तर या पर्यायाला व्हीपीएफ म्हणतात. ईपीएफमध्ये मूळ वेतनाच्या केवळ 12 टक्के रकमेचे योगदान देता येते. परंतु, VPF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

व्हीपीएफचे फायदे काय आहेत?

  • व्हीपीएफमध्ये ईपीएफ प्रमाणे 8.15 % व्याज दिले जाते.
  • VPF गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
  • हे खाते सहजपणे ट्रान्सफर करता येते.
  • या व्हीपीएफवर कर्ज घेता येते.
  • व्हीपीएफची संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते.
  • सदरील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे.
हे पण वाचा ~  PF Calculation : कर्मचाऱ्यांचे वय 25 वर्ष ,बेसिक सॅलरी 25 हजार रुपये; तर रिटायरमेंट फंड किती मिळणार? कॅलक्युलेशन समजून घ्या

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ELSS)

मित्रांनो आपल्या देशामध्ये जवळपास 12 म्युचुअल फंड कंपन्या अशा आहेत की, ज्यांच्याकडे टॅक्स सेविंग स्कीम चालू आहेत.आयकर वाचवण्यासाठी प्रत्येक कंपनीकडे ELSS असते.आपण सदरील म्युच्युअल फंड किंवा एसआयपी ऑनलाइन किंवा एजंटकडून खरेदी केले करू शकता.

आयकर वाजवण्यासाठी एक वेळ गुंतवणुकीची मर्यादा 5000 रुपये आहे. जर आपल्याला दरमहा पाचशे रुपयाची गुंतवणूक करायची असल्यास हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. ELSS जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते, परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

Public Provident Fund

पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडली जाऊ शकते. आपण कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रान्सफर करू शकता. खाते उघडण्यासाठी फक्त 500 रुपये पुरेसे आहेत.

खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सदरील योजना ही 15 वर्षांसाठी असून या दरम्यान पैसे काढता येत नाहीत. मात्र 15 वर्षांनंतर 5-5 वर्षांसाठी PPF योजनेचा कालावधी वाढवता येतो.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Retirement planning : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, ‘या’ 3 ठिकाणची गुंतवणूक पडेल उपयोगी …. ”

Leave a Comment