Close Visit Mhshetkari

SIP investment : एसआयपी चा हप्ता भरला नाही तर एसआयपी बंद होते का? पहा काय आहे नियम..

SIP investment :आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करतो. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा उत्तम पर्याय मानला जातो.

गुंतवणुकीच्या या पद्धतीमुळे नियमित बचतीची सवयही लागते आणि गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळतो.पण, अनेक वेळा आपल्या खात्यात पुरेसे पैसे शिल्लक नसतात आणि हप्ता चुकतो. पण इंस्टॉलमेंट चुकले तर काय होईल?

SIP Bank rules

फंड हाऊस एखादी चूक माफ करते. सलग चुकीला माफी न देता, तुमचे कनेक्शनचं बंद करते. त्यामुळे त्या फंडात तुमच्या खात्यातून रक्कम अदा होत नाही. आता युपीआय पेमेंटमुळे तुम्हाला बाहेरून रक्कम जमा करता येते. पण बँकेचं काय? बँक तुम्हाला माफ करते की दंड आकारते. 

बँक व्यवहार पूर्ण न केल्याने दंड आकारते. हा दंड प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो. एसआयपी पूर्वी तुम्ही खात्यात रक्कम ठेवली नसेल आणि हप्ता चुकला असेल तर बँक तुमच्याकडून दंड आकरते. विशेष म्हणजे म्युच्युअल फंड हाऊस एसआयपीपूर्वी खात्यात रक्कम ठेवण्याविषयीचा अलर्ट मॅसेज पाठवते.

परताव्यावर वाईट परिणाम

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या पेमेंटची पूर्ण काळजी घ्यावी. कारण पेमेंट न मिळाल्याने योजनेच्या एकूण परताव्यावर परिणाम होतो. काही कारणास्तव एक हप्ता चुकला तर काही फरक पडत नाही. पण, असे पुन्हा होऊ देऊ नये. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या बाबतीत शिस्तबद्ध ठेवते.

हे पण वाचा ~  SIP Investment Tips : एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? अगोदर हे नियम पहा

SIP थांबल्यास काय करावे?

काही म्युच्युअल फंड SIP मध्ये बदल करण्याचा पर्याय देखील देतात. यामध्ये तुम्ही एसआयपीची रक्कम बदलू शकता, वारंवारता बदलू शकता आणि पेमेंटची तारीख देखील बदलू शकता.या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही एसआयपी चुकण्यापासून रोखू शकता.

यासोबतच तुम्ही तुमच्या आर्थिक चक्रानुसार तुमच्या एसआयपीच्या तारखेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून पगार किंवा खात्यात पैसे येताच तुमचा एसआयपी कापला जाईल. यासह, तुमची नियमित बचत देखील सुरू राहील आणि SIP रद्द होण्याचा धोका राहणार नाही.

गुंतवणूकदारांना काळजी असते की जर ते दिलेल्या मुदतीमध्ये एसआयपी रक्कम देऊ शकले नाहीत तर त्यांचे म्युच्युअल फंड्स मध्ये नुकसान होईल. जर आपण कोणत्या आर्थिक संकटातून जात असाल किंवा नोकरीची किंवा व्यवसायातील उत्पन्नाची शाश्वती नसेल तर अशा काही कारणांमुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते.

अशा परिस्थितीमध्ये आपण आपली नियमित एसआयपी रक्कम भरू शकणार नाही हे अगदी स्वाभाविक आहे. एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय असल्याने जर मध्येच कधी रक्कम भरणे शक्य नाही झाले तरी काही हरकत नाही.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment