Close Visit Mhshetkari

Investment Tips : कमी वेळात जास्त नफा पाहिजे? तर हे आहेत बेस्ट ऑप्शन्स! 5 वर्षांत मिळतो जबरदस्त परतावा …

Investment Tips : आजच्या काळात, लोकांकडे गुंतवणुकीसाठी sip सारखे पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे चांगला परतावा मिळू शकतो.पण बरेच असे लोक आहेत जे सदरील योजनेत मध्ये गुंतवणूक करणे टाळतात.खात्रीशीर परतावा मिळू शकेल,अशा ठिकाणी गुंतवणुकीचा मार्ग अवलंबत करतात.

तुम्ही अशा योजनेच्या शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला असे गुंतवणुकीचे चांगले पर्याय सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे खूप काळासाठी ठेवावेही लागणार नाहीत. तसेच तुम्ही गुंतवलेल्या पैशावर चांगले व्याजही मिळेल. चला तर जाणून घ्या अशा स्कीम ज्या ५ वर्षात खूप चांगला परतावा देऊ शकतात.

Investment Tips 2024

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post office FD)

 • गुंतवणुकीची रक्कम: किमान १०० रुपये
 • मॅच्युरिटी कालावधी: ५ वर्षे
 • सध्याचा व्याजदर: ७.५ %
 • व्याजदराची गणना : मासिक
 • कर सवलती : होय
हे पण वाचा ~  Post Office scheme : पोस्टाची जबरदस्त योजना, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹ 5 लाखांचे गणित

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSS)

 • गुंतवणुकीची रक्कम : किमान १००० रुपये
 • मॅच्युरिटी कालावधी : ५ वर्षे
 • सध्याचा व्याजदर : ७.७ %
 • व्याजदराची गणना : वार्षिक
 • कर सवलती: होय

सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)

 • गुंतवणुकीची रक्कम: किमान १००० रुपये
 • मॅच्युरिटी कालावधी: ५ वर्षे
 • सध्याचा व्याजदर: ८.२ %
 • व्याजदराची गणना: तिमाही
 • कर सवलती : होय

आपण जर सारासार विचार केला तर तिन्ही योजना सुरक्षित आणि हमी परताव्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत. सदरील योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो.तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment