Close Visit Mhshetkari

SIP Investment : एसआयपी फक्त श्रीमंतांसाठीच असते का ? पैसे बुडण्याचा धोका किती ? जाणून घ्या ‘या’ पाच प्रश्नांची सोपी उत्तरे …

SIP Investment : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की,सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो एसआयपी फक्त श्रीमंत माणसासाठीच असते का ? पण खरं म्हणजे एसआयपी हा पर्याय सर्वच लोकांसाठी उपलब्ध असतो.ज्वाद्वारे आपण गुंतवणूक करून नफा किंवा परतवा मिळू शकतो.

SIP Investment Policy Tips 

एसआयपी फक्त श्रीमंतांसाठीच असते का ?

आपल्या मनात सदैव असा प्रश्न येतो की एसआयपी फक्त श्रीमंत माझ्यासाठीच असते का? पण मित्रांनो याचं खरं उत्तर असं आहे की सर्वांसाठीच एसआरपीचे पर्याय उपलब्ध असतात अगदी शंभर रुपयांपासून आपण एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकतो.

एसआयपीमध्ये हाय रिटर्न्सची गॅरंटी आहे का?

सर्वसाधारणपणे एसआयपी मध्ये पैसे गुंतवल्या नंतर मोठा परतावा मिळतो असा समज आहे मित्रांनो यासाठी मध्ये हाय रिटर्न ची कोणती हमी नसते मात्र शेअर बाजाराच्या तुलनेत एसआयपी मध्ये पैसे मिळण्याची शक्यता किंवा धोका कमी असतो.

हे पण वाचा ~  Sip investment : फक्त करा १०० रुपयांची गुंतवणूक, मिळवा ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री ...

जास्त कालावधीसाठी एसआयपी केल्यावरच एसआयपीमध्ये फायदा होतो का ? 

आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जास्त वेळ किंवा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो का तर मित्रांनो याचे उत्तर आहे होय एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर जेवढी गुंतवणूक जास्त कालावधीसाठी कराल तेवढा परतावा जास्त मिळत असतो.

म्यूच्यूअल फंड आणि एसआयपीमध्ये नेमका फरक काय आहे? 

मित्रांनो म्यूच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठीचा एक मंच आहे. तर एसआयपी गुंतवणुकीचे एक माध्यम आहे. SIP च्या माध्यमातूनच म्यूच्यूअल फंडातील वेगवेगळ्या फंडांत गुंतवणूक करता येते.

एसआयपीचा संबंध हा फक्त इक्विटी म्यूच्यूअल (Equity Funds) फंडाशी असतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र जोखीम पत्करायची नसेल तर डेब्ट फंडातही (Debt Funds) systematic investment policy करता येते.

Leave a Comment