Close Visit Mhshetkari

7th Pay DA hike : मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये होणार 4 % वाढ ? सोबतच घरभाडे भत्ता सुद्धा वाढणार ….

7th Pay DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि खात्रीला ही बातमी समोर आलेले असून केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी बातमी मिळणार आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकार वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ करत असते. ज्यामध्ये जानेवारी महिन्यात आणि दुसरी जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होत असते. आता महागाई भत्त्याच्या वाढी संदर्भात आकडेवारी समोर आली असून, यामध्ये काय शक्यता निर्माण झाली आहे. याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर !

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ग्राहक निर्देशांकावर अवलंबून असतो ग्राहक मंत्रालयाद्वारे वेळोवेळी ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येतो.नोव्हेंबर 2023 साठी AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत. 

नोव्हेंबर 2023 च्या निर्देशांकात 0.7 अंकांची वाढ दिसून आली आहे.यामुळे एकूण महागाई भत्ता स्कोअर 0.60 टक्क्यांनी वाढून 49.68 टक्के झाला आहे.आता येत्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता जवळपास निश्चित करण्यात आल्या आहे.

हे पण वाचा ~  7TH PAY COMMISSION : मोठी बातमी.. लोकसभा आचारसंहिता चालू असताना ' या ' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२४ पासून ५० टक्के भत्ता मिळणार आहे.पण त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल.यानंतर 0 पासून महागाई भत्त्याची गणना सुरू होईल.

आता हा वाढलेला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल.समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9000 रुपयांच्या 50 % रक्कम जोडली जाईल.

HRA hike calculator

महागाई भत्ता 50% झाल्यानंतर आणखी एका भत्त्याची मेजवानी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.ती म्हणजे घरभाडे भत्त्यात सुद्धा आपोआप वाढ होणार आहे. ज्यावेळेस सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता 25% झाला होता तेव्हा घरभाडे भत्त्यात वाढ केली होती. आता 50 टक्के मागे भत्ता झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात सुद्धा आपोआप वाढ होणार आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लवकरच लोकसभेच्या निवडणुकीचे बिल वाजणार असल्याकारणाने, सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीबरोबर घरभाडे भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. केंद्राने सदरील भत्ता वाढल्यानंतर राज्य सरकार सुद्धा महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

1 thought on “7th Pay DA hike : मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये होणार 4 % वाढ ? सोबतच घरभाडे भत्ता सुद्धा वाढणार ….”

Leave a Comment