Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यावरती भारतीय नागरिकांचा मोठा भर असतो त्याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा एफडी केल्या जाते सुरक्षित गुंतवणूक असल्याकारणाने हा लोकप्रिय पर्याय मानला जातो.
भारतामध्ये एफडीत गुंतवणूक केल्यानंतर मे 2022 पासून व्याजरात वाढ करण्यात आली आहे.पगारदार त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक नाहीतर हजारो लोक मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवत आहेत. परंतु एफडी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे अनेक तोटे किंवा महत्त्वाच्या बाबी सुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे त्याचा विचार आज आपण या लेखांमध्ये करणार आहोत.
Bank FD New rule
कमी परतावा :- एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा तोटा म्हणजे मुदत ठेवीवर कमी आणि निश्चित व्याज दिले जाते त्याच्या तुलनेत म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.
लॉक-इन-पीरियड :- मुदत ठेवीचा एक सर्वात मोठा तोटा म्हणजे एफडी मध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे ठराविक कालावधीसाठी ब्लॉक केले जातात.याचा अर्थ तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशाची गरज पडल्यास पैसे काढता येत नाहीत.जर काढले तर व्याज अत्यल्प मिळते आणि आपला तोटा होतो.
निश्चित व्याजदर :- बँक एफडी चा सर्वात मोठा तोटा म्हणजे ज्या वेळेस आपण एफडी साठी अर्ज करतो, त्यावेळेस असलेला व्याजदर निर्धारित करण्यात येतो. जेव्हा ठराविक कालाने एफडीसी व्याजदर वाढतात तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही. एफडी संपेपर्यंत दिलेल्या दरानेच आपल्याला व्याज मिळते.
Benifit of fixed deposit
TDS :- आपण जर एफडी मध्ये पैसे गुंतवलेले असेल आणि आपण आयकर पात्र असाल तर एफडीवर मिळणाऱ्या व्याज हे करपात्र असते त्यामुळे आपल्याला इतर श्रोताकडून मिळणारे मिळकत या शिक्षण अंतर्गत आयकर भरावा लागतो.
महागाई :- मगाच्या तुलनेत एफडी मध्ये गुंतवणूक करणे केल्यानंतर मिळणारा परतावा हा अत्यल्प असतो कारण पाच वर्षानंतर महागाई खूप झालेली असल्याने मिळणारा परतावा त्या तुलनेत पटत नाही.FD वरील व्याजदरापेक्षा महागाईचा दर जास्त असल्यास, तुमच्या पैशाचे मूल्य कालांतराने कमी होईल.
बँक दिवाळखोरी :- आपण जर एफडी ही राष्ट्रीयकृत बँकेत केली असल्यास व्याजदर कमी मिळतो.एखाद्या छोट्या बँकेत गुंतवणूक केल्यास बँक दिवाळखोरीत जाण्याचा धोका सुद्धा नेहमीच असतो. त्यामुळे गुंतवणुकीचा सर्व किंवा काही भाग आपण अशा वेळेस गमावू शकतो.
प्री-मॅच्युअर दंड :- आपण FD मध्ये गुंतवलेल्या पैशाची आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास, आपण जर एफडी मोर्चा विचार केला तर आपल्याला दंड भरावा लागतो.त्यामुळे व्याजदर सोडा आर्थिक भुर्दंड आपल्याला सहन करावा लागतो