Sevanivrutti vay : कृषि विभागाच्या दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील कृषि विद्यापीठामधील सहायक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,प्राध्यापक,अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६२ वर्षे करण्यात आली होती.
सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६० वर्ष!
मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.५५२७-५५४७/२०१३ यामध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेमध्येबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला राहतील असा निर्णय दिलेला आहे.
आता राज्यातील कृषि विद्यापीठांमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख,सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रिडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्यात आला आहे.
सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यात ६० वर्षाचे होतील, त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवेतून निवृत्त होतील आणि ज्या अध्यापकीय कर्मचा-यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी ६० वर्षे वयाचे होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्नोतर सेवानिवृत्त होतील.
कृषि व पदुम विभागाच्या दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयास अनुसरून ज्या अध्यापकीय कर्मचा-यांनी, सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६२ वर्ष केलेल्या निर्णयाचा लाभ घेतलेला आहे, असे ६० वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी, वयाची ६२ वर्षे पूर्ण होताच सेवानिवृत्त होतील.
Retirement Age New Updates
सदर शासन निर्णय मा.मंत्रिमंडळाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.२१/१९/सेवा-४ दि.२५.०१.२०१९ अन्वये मिळालेल्या सहमती नुसार निर्गमित करण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय पदांसाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत व त्यांना संधी देऊन कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक आहे.
नवीन अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारे कुशल अध्यापकीय मनुष्यबळ दीर्घकालीन विचार करता निर्माण करणे आवश्यक असून, नवीन भरतीमुळे विद्यापीठामध्ये संशोधन, शिक्षण या क्षेत्रामध्ये दीर्घ स्वरुपात अनुभवी व कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल.