Salary Account : नमस्कार मित्रांनो आपण जर कॉर्पोरेट क्षेत्रात म्हणजे कंपनीमध्ये नोकरी करत असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी बँकेकडून सॅलरी अकाउंट ची सुविधा देण्यात येत असते.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी State Government Salary Package आणि तुम्ही कॉर्पोरेट नोकरी असाल तर CSP सॅलरी अकाउंट (पगार खाते) उघडण्याचा पर्याय दिला जातो.
पगार खात्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात त्याची माहिती आपण पाहिलेलीच आहे आता सदरील पगार खाते काही कारणास्तव सामान्य म्हणजेच सेविंग / बचत खात्यात रूपांतरित होऊ शकते,तर काय आहे त्याची कारणे पाहूया सविस्तर.
Salary Vs Savings Account Benefits
होय, मित्रांनो आपल्याकडून एखादी चूक झाल्यास आपले सॅलरी अकाउंट पूर्व सूचना न देता सेविंग खात्यात वर्ग होऊ शकतो. पगार खात्याला मिळत असलेल्या सुविधा सुद्धा यामुळे बंद होऊ शकतात.यामध्ये किमान शिल्लक रक्कम ट्रांजेक्शन लिमिट एटीएम चार्ज या सगळ्या सुविधांचा समावेश असू शकतो.
सॅलरी अकाउंटचा नियम तुम्हाला माहित्येय का?
जगभरामध्ये गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर टाळी बंदी करण्यात आलेली आहे कंपन्यांनी आपल्या खर्चात बरोबर नोकर वर्गात सुद्धा कपात केली आहे.असे झाल्यास साहजिकच कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणारा पगार सुद्धा बंद होत असतो परिणामी आपल्या पगार खात्याला मिळणाऱ्या सुविधा सुद्धा बंद केल्या जातात.
पगार खाते बचत खात्यात केव्हा बदलेल ?
बँकिंग नियमानुसार आपला पगार खात्यात सलग तीन महिने पगार जमा न झाल्यास, बँक आपल्या खात्याला बचत खात्यात रूपांतरित करू शकते. यासह आपल्याला मिळणाऱ्या सर्व सुविधांसाठी आपल्याला चार्ज द्यावा लागेल.
जवळपास सर्वच पगार खात्यांचे अकाउंट हे झिरो बॅलन्स वर उघडले जातात. यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नसते आणि जरुर रक्कम असल्यास कोणताही चार्ज आकारला जात नाही.
पगार खात्याचे आणखी बेनिफिट्स पाहायचे झाल्यास मोफत चेकबुक, पासबुक, ई-स्टेटमेंट, शुल्काशिवाय डेबिट कार्ड, फोन बँकिंग, ऑनलाइन फंड ट्रान्सफर, डिमॅट खाते आणि सुविधा,कर्ज सुविधा व क्रेडिट कार्ड यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.