Close Visit Mhshetkari

School holidays : दिवाळी सुट्टी जाहीर! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील सुट्ट्यांचे नियोजन व यादी

School holidays : सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022 अन्वये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा मध्ये बुलडाणा जिल्हयातील सर्व (सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन) प्राथमिक शाळांना खालीलप्रमाणे दिवाळी सुट्टयांचे नियोजन तयार करण्यात आलेले आहे.

दिवाळी सुट्टी हिंगोली जिल्हा

शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ मधील उन्हाळी – दिपावलीच्या दिर्घ सुटयाबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ मध्ये उन्हाळी सुट्या दि.०२ मे २०२३ पासून ते दि. १४ जुन २०२३ पर्यंत राहतील. दि. १५ जुन २०२३ रोजी पासुन शाळा नियमितपणे सुरु होतील.

दिपावलीनिमित्त दिर्घ सुट्या दि.०६ नोव्हेंबर २०२३ ते दि. २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहतील. दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रविवार व दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टि असल्यामुळे दि. २८ नोव्हेंबर २०२३ पासुन शाळा नियमितपणे सुरु होतील.

१ ली ते इ.९ वी व इ. ११ वी चा निकाल दि. २९ एप्रिल २०१३ रोजी अथवा त्यानंतर सुट्टिच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी पालकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

रत्नागिरी जिल्हा सार्वजनिक सुट्टी यादी

गणपती सुद्री सोमवार दि. १८ सप्टेंबर २०२३ ते बुधवार दि. २७ सप्टेंबर २०२३ – ९ दिवस (रविवार वगळून)

हिवाळी (दिवाळी) सुट्टी गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ ते शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ १५ दिवस (रविवार वगळून) उन्हाळी सुट्टी गुरुवार दि.०२ मे २०२४ ते मंगळवार दि. १९ जून २०२४ पर्यंत राहील. ३५ दिवस (रविवार वगळून)

दोन स्थानिक पातळीवरील सुट्टया

जिल्हाधिकारी घोषित स्थानिक सुट्टी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना घेता येणार नाही.आपल्या स्थानिक सुट्टया अगोदरच निश्चित केलेल्या आहेत.

एकूण सुट्टया किरकोळ ३४ दिवस + उन्हाळी सुट्टी ३५ दिवस + हिवाळी सुट्टी १५ दिवस = ८४ दिवस

परभणी जिल्हा शाळा सुट्टी नियोजन

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जाऊ प्राशिस / २०२३ / शाळा सुट्टि ५१६६२३६ दि २०.०४.२३ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी व दिपावलीच्या दिर्घ सुटयाबाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

हे पण वाचा ~  Public Holidays : मोठी बातमी.... १२ जानेवारी रोजी या जिल्ह्यात सुट्टी जाहीर! परिपत्रक निर्गमित ....

शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये उन्हाळी सुटया दिनाक ०२ मे २०२३ ते दिनाक १४ जून २०२३ पर्यंत देण्यात आल्या असून १५ जून २०१३ रोजी शाळा नियमितपणे सुरु झालेल्या आहेत.

दिपावलीनिमित्त दिर्घ सुटया दिनाक ०६ नोव्हेंबर २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहतील. दिनाक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रविवार व दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरु नानक जयंतीची सार्वजनिक सुटी असल्यामुळे दिनाक २८ नोव्हेंबर २०२३ पासुन शाळा नियमित सुरु होतील.

बीड जिल्हा परिषद शाळा दिवाळी सुट्टी

बीड जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या खालीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहेत.

दिवाळी सुट्टी (मराठी माध्यम)- दि.०६/११/२०२३ ते २५/११/२०२३ दि. २६/११/२०२३ रोजी रविवार व दि. २७/११/२०२३ रोजी गुरुनानक जयंती असल्याने दि. २८/११/२०२३ रोजी पासुन नियमित शाळा सुरु होतील.

दिवाळी सुट्टी (उर्दू माध्यम) :- दि.०६/११/२०२३ ते २१/११/२०२३ ( उर्दू माध्यमाच्या शाळांना ५ सुट्टया दिल्या असल्याने दि.२२/१२/२०२३ रोजी उर्दू माध्यमाच्या शाळा नियमित सुरु होतील.)

जालना जिल्हा परिषद शाळा दिवाळी सुट्टी

जालना जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्टी या खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

दिवाळी सुट्टी दिनांक 09/11/2023 ते 25/11/2023

दिनांक 26/11/2023 रोजी रविवार व दिनांक 27/11/2023 रोजी गुरु नानक जयंती असल्याने दिनांक 28/11/2023 पासून शाळा सुरु होतील.

शाळांना दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी सुट्टी शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने समायोजनाने घेण्यात येईल.

सार्वजनिक सुट्टी यादी व सर्व जिल्हा परिषद शाळा सुट्टी यादी येथे डाऊनलोड करा

Public Holidays

3 thoughts on “School holidays : दिवाळी सुट्टी जाहीर! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील सुट्ट्यांचे नियोजन व यादी”

  1. आदरणीय सरजी नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत सर्व सुट्टी यादी टाका आणी दिवाळी सुट्टीची यादी पण टाका. 🙏🙏🙏

    Reply
  2. वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व सुट्टी यादी टाका.

    Reply

Leave a Comment