Car loan offers : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या स्वप्नातील चार चाकी गाडी घेण्याचा प्रत्येक जण विचार करत असतो. मात्र गाडी खरेदी करण्यासाठी आपल्याला गरज पडते ती कार लोनची.
आपण अनेक वेळा कोणता विचार न करता खरेदी करण्याचा निर्णय घेतो. मोठे कार लोन घेऊन आपण आर्थिक नियोजनावरती मोठा ताण आणतो.
कार लोन घेताना कोणती काळजी घ्यावी व कोणत्या गोष्टींचा विचार करावा ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. ज्याद्वारे आपण आपल्या आर्थिक नियोजनावर जास्त ताण न आणता आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी करू शकतो.
Car loan Tips 2024
कार लोन घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
1. बजेट निश्चित करा : – चार चाकी गाडी ती खरेदी करताना आपण गाडी खरेदी करण्यासाठी खर्च किती करू शकतो याचा विचार अगोदर करायला हवा ज्यामध्ये गाडीची किंमत रजिस्ट्रेशन शुल्क विमा आणि इतर खर्चाचा समावेश असतो.
2. डाउन पेमेंटची रक्कम :- फोर व्हीलर खरेदी करताना गाडीच्या किमतीचा काही भाग आपल्याला डाऊन पेमेंट म्हणून भरावा लागतो.डाऊन पेमेंट जितका जास्त असेल तेवढा हप्ता कमी बसतो आणि परिणामी व्याज कमी भरावी लागते.
3. कर्जदाराची निवड :- बाजारात अनेक वित्तीय संस्था किंवा बँक आपल्याला फोर व्हीलर लोन किंवा व्हेईकल कर्ज देत असतात आपण या बँकांचे व्याजदर चेक करूनच बँकेची निवड करावी साधारणपणे राष्ट्रीय बँकेत कमी व्याजदर मिळतो.
4. Car loan Interest Rate :- व्याजदर हा कार लोनचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कमी व्याजदराने आपण कर्जावर कमी व्याज म्हणून द्यावे लागते.
5. कर्ज रक्कम आणि परतफेड : – आपल्याला हवे असलेल्या रकमेच्या आवश्यकतेनुसार व आपण भरू शकणाऱ्या हप्त्यानुसार कर्जाची रक्कम निश्चित करा.लोनची परतफेडीची मुदत जितकी जास्त असेल, तितका आपल्या EMI चा भार कमी होईल.
Vehicle loan offers
6. कागदपत्रांची पूर्तता :- कार लोन मिळवण्यासाठी बँकेला आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर जमा करा.
7. क्रेडिट स्कोअर :- आपला क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल, तितका कर्ज मिळण्याची शक्यता जास्त.
8. कर्ज प्रक्रिया :- लोन कसे मिळते ? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात ? कागदपत्रे कसे जमा करावी लागतात याची सविस्तर माहिती अगोदर जाणून घ्यावी.
9. चांगल्या ऑफरचा लाभ : मार्केटमध्ये अनेकदा कारणांवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात या ऑफरचा फायदा घेऊन आपण कर खरेदी केल्यास आपल्याला नक्कीच कर्जाच्या रकमेवर फायदा घेता येऊ शकतो.
10. लोन घेण्यापूर्वी सल्ला : – कार खरेदी करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला द्या त्याचबरोबर आपल्या मित्रांनी घेतलेल्या कार्स विषयी किंवा सोशल मीडिया वरती कार विषयी सविस्तर माहिती बघा.
कार लोन हा स्वप्नातील गाडी खरेदी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मात्र, लोन घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. चांगली योजना आणि योग्य निवड केल्यास आपण सहजपणे कार लोन मिळवून आपल्या स्वप्नातील गाडी घरी आणू शकता.