Close Visit Mhshetkari

School Holiday : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टया 2023 केल्या जाहीर! कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या,पहा संपूर्ण यादी

School holidays : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ – जेयूडीएल / तोन,दिनांक ८ मे १९६८ नुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

राज्य शासनाने अधिसूचनेनुसार सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या असून यावर्षी एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहेत.सुट्टयांची यादी आपण या लेखात पाहणार आहोत.

Maharashtra Public holidays 2023

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (गुरुवार) ,महाशिवरात्री १८ फेब्रुवारी (शनिवार) ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी (रविवार) ,होळी (दुसरा दिवस) ७ मार्च (मंगळवार) ,गुढीपाडवा २२ मार्च (बुधवार) ,रामनवमी ३० मार्च (गुरुवार) ,महावीर जयंती ४ एप्रिल (मंगळवार) ,गुड फ्रायडे ७ एप्रिल (शुक्रवार) ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (शुक्रवार) ,महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार) ,बुद्ध पौर्णिमा ५ मे (शुक्रवार) ,बकरी ईद (ईद उल झुआ)२८ जून (बुधवार) ,मोहरम २९ जुलै (शनिवार) ,स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (मंगळवार),

हे पण वाचा ~  School Holidays : मोठी बातमी .. राज्यातील शाळांचे सुट्टीचे वेळापत्रक जाहीर! पहा कधी लागणार सुट्ट्या आणि केव्हा उघडणार शाळा ? परिपत्रक आले ...

School holiday list

पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट (बुधवार) ,गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर (मंगळवार), ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर (गुरुवार), महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (सोमवार),दसरा २४ ऑक्टोबर (मंगळवार), दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर (रविवार),दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर (मंगळवार),गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर (सोमवार) ,ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आता बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज सणाला शासकीय कार्यालये,राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.

सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28/6/2023 रोजी देण्यात आली होती, सण गुरुवार, दि.29.06.2023 रोजी आल्याने या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

Leave a Comment