Close Visit Mhshetkari

Salary Budget : कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतना संदर्भात मोठी अपडेट्स ! महागाई भत्ता, फरक, वेतन आयोग फरक बाबत परिपत्रक निर्गमित….

Salary Budget : सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील माहे जुले,२०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता, महागाई भत्ता याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडून यांचेकडून खालील लेखाशिर्वाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व बांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

Employee Salary Budget

अ) सदरील निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्याच्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.

आ) सदर खर्चचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा, तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.

हे पण वाचा ~  Gratuity Eligibility : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रॅच्युईटी नियमात मोठा बदल ! आता अशीही मिळणार ग्रॅच्युइटी ? पहा सविस्तर ....

इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९(ब) टिप-४ अनुक्रमाक ५नियम ३९ (ब) टिप-५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये, वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.

तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.वितरीत केलेले अनुदान केवळ वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह निधी क्रमांक असणा-या कर्मचा-यांना त्यांच्या भनिनि खात्यात जमा व ज्या कर्मचा-यांचे डीसीपीएस/एनपीएस खाते आहे, अशांना रोखीने अदा करणे,जानेवारी २०१४ ते जून २०२४ अखेरचा महागाई भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येणार नाही.

Leave a Comment