Close Visit Mhshetkari

Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होईल का ? सरकारने स्पष्टच सांगितले…

Retirement age : केंद्र सरकार मधील काही कर्मचारी तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृतीचे वय केंद्र व भारतीय प्रशासकीय सेवेप्रमाणे 60 वर्ष करण्याबाबात राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे.

Employees Retirement Age

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत ज्याप्रमाणे चर्चा सुरू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत चर्चा सुरू असताना, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरच वाढणार का याबाबत केंद्र शासनाने नुकतीच संसदेत एक मोठी माहिती दिली आहे.

केंद्र शासनाने 10 ऑगस्ट 2023 रोजी संसदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत कोणताच प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचा ~  DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आज महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय होणार ?

तसेच मागील तीन वर्षात तब्बल 122 केंद्रीय कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आले असल्याचे महत्त्वाची माहिती देखील यावेळी सरकारच्या माध्यमातून संसदेला देण्यात आली आहे.

कर्मचारी सेवानिवृत्त वय 60 वर्ष

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाने देखील प्रस्ताव सादर केला होता,परंतु या प्रस्तावाला अतिरिक्त मुख्य सचिवांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबीत आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्य सरकारी बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती पण या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. 

9 thoughts on “Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होईल का ? सरकारने स्पष्टच सांगितले…”

  1. Nako निवूर्ती वय 60 यापेक्षा 55 करा atleast स्त्री या साठी तरी

    Reply
    • 55 करावे. नविन मुलांना संधी द्यायला पाहिजे. कारण ते जास्त TECHNOSEVY आहेत.

      Reply
  2. तरुण लोकांना लवकर नोकरी द्या ते आता च्या डिजिटल work साठी capable आहेत, जे निवुर्ती ला आलेत त्यांना प्र शी शन द्यावे लागेल

    Reply
    • ते ‘निवृत्ती’ आणि ‘प्रशिक्षण’ असे लिहायला पाहिजे प्र शी श न नव्हे मॅडमजी

      Reply
  3. जस सेवेत घेताना अगोदर 28 नंतर 33 आता 38 वर्षे वय केलेत,,तर नोकरीला उशिरा लागल्यास सेवानिवृत्त वय 60 व्हावे,,,कदाचित 2010 नंतर चे जे कर्मचारी आहेत,,त्या सर्वांसाठी हा नियम करावा…👍..
    जुन्या लोकांसाठी 58 असावे

    Reply
  4. तरुण मुले वाट पहात आहेत५५ केले पाहिजे

    Reply

Leave a Comment