Retirement planning : निवृत्तीचे नियोजन म्हणजे आत्ता आणि भावी आयुष्यासाठी स्वतःला तयार करणे. सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे निवृत्तीचे ध्येय निर्माण करणे, आवश्यक रकमेचा हिशोब करणे आणि तुमची बचत वाढवण्यासाठी योग्य मार्गाने गुंतवणूक करणे. दरम्यान, तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन का करावे, हे समजून घ्या.
सेवानिवृत्तीचे नियोजन का करावे?
कामाचे सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करणे म्हणजे तुम्ही तुमच्या सुवर्ण काळामध्ये तुमचे आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवणे.सेवानिवृत्तीचे नियोजन आर्थिक नियोजनाचे अत्यंत महत्वाचे पैलू बनते.
सेवानिवृत्तीनंतर निश्चिंत जीवन एन्जॉय करण्यासाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी, लवकर नियोजन सुरू करणे गरजेचे आहे.
निवृत्तीचे नियोजन कसे करावे?
निवृत्ती योजना बनवण्यापूर्वी तुमचे सध्याचे उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. आपल्याकडे बचत करण्यासाठी पैसे आहेत, याची खात्री करा. त्यांनतर कौटुंबिक खर्च आणि अन्न व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बजेटचा एक भाग म्हणून सेवानिवृत्तीच्या बचतीचा समावेश केला पाहिजे जेणेकरून तुम्ही प्रत्येक महिन्यासाठी पैसे बाजूला ठेवू शकता.
रिटायरमेंट प्लॅनिंग काही महत्वाचे मुद्दे-
- तुमचे रिटायरमेंट त्रासमुक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करणे.
- आपत्कालीन निधी सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन निधी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.निवृत्तीनंतर तुमच्या सर्व खर्चांसाठी स्वतंत्र खर्च अकाउंट ठेवा.
- रिटायरमेंट साठी लागणारा निधी हा केवळ रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठीच जमा करायचा. त्याचा उपयोग अन्य दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी करायचा नाही.
- सध्या महागाईचा दर ६% असेल तर रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना जी गुंतवणूक करत आहोत त्या गुंतवणुकीतून साधारणतः १५% परतावा मिळायला हवा.
- रिटायरमेंट साठी निधी किती जमा करायचा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. रिटायरमेंट नंतर पुढे साधारणतः २० वर्षं पुरेल एवढा रिटायरमेंट निधी जमा केला पाहिजे.