Close Visit Mhshetkari

Credit Card Tips : इन्कम प्रूफ नसतानाही मिळू शकते क्रेडिट कार्ड? पण कसे? जाणून घ्या सविस्तर

Credit Card Tips : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.क्रेडिट कार्डचा वापर करताना आपल्याला माहिती असेल की वेगवेगळ्या ऑफर बँकेकडून देण्यात येतात.

ऑनलाईन शॉपिंग असेल खरेदी असेल किंवा पैसे नसताना सुद्धा आपण दवाखाना एम आय इतर सर्व गरचा भागवू शकतो. पण हे क्रेडिट कार्ड उत्पन्नाचा पुरावा नसेल तर असा बँका देत नाही.मात्र, या काही टिप्स वापरून तुम्ही इन्कम प्रुफ नसतानाही क्रेडिट कार्ड घेऊ शकता.

Credit card new offers

विद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांनादेखील क्रेडिट कार्डची गरज भासते. अशावेळी इन्कम प्रुफ नसल्यास केड्रिट कार्ड मिळणे अवघड होते. तुमच्याकडेही इन्कम प्रुफ नसताना क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे तर या टिप्स फॉलोकरुन आरामात कार्ड मिळवू शकता.

Bank Bazaar वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे., बँक खाते हे कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीचे किंवा इतिहासाचे साधन असते तुम्ही कोणत्याही कंपनीची क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर आपल्याला बँक खात्याची आवश्यकता असते.

पती किंवा पत्नीच्या इन्कमची माहिती द्या

आपल्याकडे उत्पन्नाचा प्रूफ नसेल तर आपण क्रेडिट कार्ड घ्यायचा विचारात असाल तर आपण आपल्या पत्नीच्या किंवा पतीच्या उत्पन्नाचा दाखला देऊन किंवा माहिती देऊन सुद्धा क्रेडिट कार्ड घेऊ शकतो.त्यामुळे क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते.

हे पण वाचा ~  FD Credit Card : एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? पहा फायदे,चार्ज लिमिट सविस्तर माहिती...

Credit card on Bank FD

अनेक बँका किंवा वित्तीय संस्था आपण जर आपल्या खात्यामध्ये बँक एफडी केलेली असेल तर अशा बँक एफडी वरती सेक्युरिटी क्रेडिट कार्ड देत असतात साधारणपणे आपल्या बँक एफ डी च्या 75 ते 80% पर्यंत मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड आपल्याला या ठिकाणी मिळते

एका क्रेडिट कार्डच्या बदल्यात मिळवा दुसरे क्रेडिट कार्ड

जर आपल्याकडे उत्पन्नाच्या प्रूफ नसेल तर आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपण अगोदर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डच्या बदल्यात सुद्धा नवीन क्रेडिट कार्ड मिळू शकते.जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर इन्कम प्रुफ न दाखवताही तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता.

इन्कम प्रुफ नसतानाही या बँका देतात क्रेडिट कार्ड

  • भारतीय स्टेट बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • कोटक महिंद्रा बँक
  • ॲक्सिस बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया

दोन लाख रुपये मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड मिळवा 10 मिनिटात

Credit card

Leave a Comment