Close Visit Mhshetkari

Retirement age : शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर! लवकरच मिळणार …

Retirement age : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 17 लाख आहेत. त्यातील दरवर्षी जवळपास 3% राज्य कर्मचारी सेवा निवृत्त होतात.राज्य शासन सेवेत नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे असल्याने बऱ्याच राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल अत्यंत कमी मिळतो.

महाराष्ट्र राज्य सरकार अनुकूल

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्च 2023 रोजी संप पुकारला होता यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक अभ्यास समितीची स्थापना केली होती.सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला होता.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे – पवार – फडणवीस सरकार निश्चितच हा निर्णय घेऊ शकते असे काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.राज्य शासन याबाबतचा शासन निर्णय केव्हा काढते? यावर सकारात्मक निर्णय केव्हा घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा ~  Fitment Factor : मोठी बातमी... 48 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ ! मोदी सरकार करणार ही' मोठी घोषणा ?

पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो.परिणामी 60 हजार कर्मचारी वर्गास सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4 हजार कोटी रुपये वाचणार आहे.

सेवानिवृत्त वय 60 वर्षे आवश्यकता

  • अतिरिक्त कार्यभाराच्या तणावाने शेकडो कार्यक्षम सरकारी अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.
  • राज्यातील दर वर्षी 3 % म्हणजेच जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी निवृत होतात, अशावेळी रिक्त पदांची वाढ तातडीने थांबवणे गरजेचे आहे.
  • शासकीय सेवेतील अकार्यक्षम आणि संशयातीत सचोटी या कारणास्तव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वय वर्षे 50 आणि 55 वयाच्या कालावधीत सेवा पुनर्विलोकन करून त्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्यात येते.
  • कर्मचाऱ्यांलाच नोकरी करण्याची इच्छा नसेल, अशांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय खुला असतो.

आपले पॅनकार्ड खराब झाले, हरवले असे करा डाऊनलोड दोन मिनिटांत

➡️➡️E pan card Download⬅️⬅️

1 thought on “Retirement age : शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर! लवकरच मिळणार …”

  1. सेवा निवृत्ती वय ७५ करण्यात यावे म्हणजे इच्छुक उमेदवार कांदा बटाटा, सँडविचेस, वडा पाव विकण्याचा धंदा करण्यास मोकळे.

    Reply

Leave a Comment