DA hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ! पहा किती वाढणार पगार

DA hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आलेली आहे तर बघूया सविस्तर माहिती

Dearness allowance hike

दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे. त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचान्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  DA Calculator : आनंदाची बातमी ..... राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; पहा किती किती वाढणार पगार आणि किती मिळेल फरक

महागाई भत्ता वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 

Dearness allowance

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्यासहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

महागाई भत्ता 46% झाल्यानंतर आता तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ? आता येथे चेक  करा.

  • सर्व प्रथम तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका
  • HRA निवडा
  • CLA लागू असल्यास टाकावा
  • वाहतूक भत्ता टाकावा

👉 DA Calculator 👈

Leave a Comment