New rule : 1 जानेवारी 2024 पासून आर्थिक क्षेत्रात काही बदल होणार आहेत. या बदलांमुळे ग्राहकांना काही सोय होणार असून, काही बाबतीत दंडही आकारला जाणार आहे.
New Rule from 1st january
आयटीआर दाखल न केल्यास दंड :- आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. आयकर अधिनियम कायद्याच्या कलम 234 एफ नुसार, जी व्यक्ती निश्चित तारखेपूर्वी आपला रिटर्न दाखल करणार नाही, त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
उशिराने आयटीआर फाइल करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. मात्र ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना केवळ 1,000 रुपये दंडच भरावा लागेल.
बँक लॉकर काँट्रॅक्ट : RBI नुसार, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 करण्यात आली आहे. जर एखाद्या बँक ग्राहकाला हे शक्य झाले नाही, तर त्यांचे लॉकर फ्रीज करण्यात येईल.
नवीन सीमसाठी केवायसी आवश्यक
1 जानेवारी 2024 पासून नवे सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांतही बदल होत आहेत. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवे सीम कार्ड खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना आता केवायसी जमा करावे लागणार आहे.
नॉमिनीची माहिती देणे आवश्यक :- सेबीने सर्व डीमॅट खाताधारकांसाठी 1 जानेवारी 2024 पर्यंत नॉमिनीची माहिती देणे बंधनकारक केले आहे. खातेधारकांनी असे केले नाही, तर त्यांना शेअर्सची खरेदी विक्री करता येणार नाही.
निष्क्रिय यूपीआय आयडी बंद :- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्स (गूगल-पे, पेटीएम, फोन पे) आदींवरून, एक वर्षाहून अधिक काळापासून सक्रिय नसलेले UPI ID आणि नंबर्स निष्क्रिय करण्यास सांगण्यात आले आहेत. या दिशा-निर्देशांनुसार, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना (पीएसपी) 31 डिसेंबरपर्यंत याचे पालन करावे लागेल.
बदलांचे पालन न केल्यास होणारे परिणाम
- आयटीआर दाखल न केल्यास दंड आकारला जाईल.
- बँक लॉकर काँट्रॅक्टवर स्वाक्षरी न केल्यास लॉकर फ्रीज होईल.
- नवीन सीम कार्ड खरेदी करताना केवायसी न केल्यास सिम कार्ड मिळणार नाही.
- नॉमिनीची माहिती न दिल्यास शेअर्सची खरेदी विक्री करता येणार नाही.
- निष्क्रिय यूपीआय आयडी बंद होईल.
या बदलांचा आपल्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बदलांची काळजीपूर्वक नोंद घेऊन त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.