Close Visit Mhshetkari

PVC Aadhaar Card : आता फक्त 50 रुपयांत घरपोच मागवा ATM सारखे स्मार्ट आधार कार्ड ! पहा सोपी प्रोसेस… 

PVC Aadhaar Card : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की अनेक लोक PVC आधार कार्ड वापरतात. नवीन PVC कार्ड अगदी ATM Card किंवा Credit Card सारखे दिसते जे आपण आपल्या खिशात सहज वापरू शकता. UIDAI च्या मते PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे.

आता हे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे तेही फक्त पन्नास रुपयात याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Download PVC Aadhar Card 

  • सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • आता ‘My Aadhaar’ विभागात जा.
  • ‘Order PVC Aadhaar Card’ वर क्लिक करावे.
  • तुमचा आधार क्रमांक किंवा EID टाका
  • (12 अंकी आधार क्रमांक, 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकू शकता)
  • शेवटी कॅप्चा टाकावा.
  • ‘Send OTP’ वर क्लिक करावे.
  • OTP टाकून आणि सबमिट करा.
  • आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर OTP येतो.
  • शेवटी OTP टाकून ‘Submit’ बटनावर वर क्लिक करावे.
  • आपले PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसते.
हे पण वाचा ~  Aadhaar Card : सरकारची मोठी घोषणा. बायोमेट्रिक्सशिवाय बनवा आधार कार्ड, असा करा अर्ज

जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर

  • ‘Send OTP’ समोर दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे.
  • आपला नवीन चालू मोबाइल नंबर टाकावा.
  • ‘Send OTP’ बटणावर क्लिक करावे.
  • शेवटी 50/- रूपये फी पेड करण्यासाठी पेमेंटचा पर्याय निवडून डिजिटल पेमेंट, नेटबँकिंग किंवा UPI माध्यमांद्वारे 50 भरावे.

Online PVC Aadhaar Card

पेमेंट ऑप्शन पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपले पीव्हीसी आधार कार्ड घरपोच प्राप्त होते साधारणपणे पंधरा दिवसापर्यंत हे कार्ड आपल्या घरी स्पीड पोस्टाने येऊन जाईल.

सदरील पीव्हीसी आधार कार्ड वरती सुरक्षिततेसाठी नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, गुइलोचे पॅटर्न,घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत.क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता त्वरित पुष्टी केली जाऊ शकते.PVC कार्ड 5 वर्षांसाठी वैध आहे.

आपण UIDAI च्या पोर्टलवरून तुमच्या PVC आधार कार्डची स्थिती तपासू शकता.

  • अधिक माहितीसाठी UIDAI ची अधिकृत वेबसाइट : https://uidai.gov.in
  • UIDAI चा हेल्पलाइन नंबर : 1947

Leave a Comment