Close Visit Mhshetkari

Income tax rule : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी.. 31 जुलैपुर्वी निर्मला सीतारामन् यांची मोठी घोषणा! आता या वर मिळणार आयकर सुट..

Income tax new rule : आयकर दात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या ITR भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी कोणत्या बाबींवर आयकर सूट मिळू शकते ? या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत ज्याद्वारे नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांनी खाजगी नोकरदारांना फायदा होणार आहे.

ग्रॅच्युइटी रक्कमेवर कर सुट

सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांने कोणत्याही संस्थेत 5 वर्षानंतर आपली कंपनी सोडल्यास त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत असतो. सदरील रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर 20 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त असून खासगी कर्मचाऱ्यांची 10 लाखांपर्यंतची रक्कम आयकर मुक्त असते.

PPF आणि EPS वर कोणताही कर नसणार

पीपीएफच्या पैशांवर कोणताही कर नाही.यावर मिळणारे व्याज, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम,तिन्ही करमुक्त आहेत.यासोबतच,जर कर्मचाऱ्याने 5 वर्षे सतत काम केल्यानंतर त्याचा EPF काढला तर त्याला या रकमेवरही कर भरावा लागणार नाही.

हे पण वाचा ~  Tax on GPF : भविष्य निर्वाह निधी वर्गणी व थकबाकी रक्कमे संदर्भात आयकर विभागाची नवीन नियमावली ! शासन निर्णय निर्गमित ...

या भेटवस्तूंवर नसणार कोणताही कर 

जर आपल्या आपल्या पालकांकडून कौटुंबिक मालमत्ता,रोख पैसे किंवा दाग – दागिने मिळाले असेल तर ते आयकरमुक्त आहे.या भेटवस्तूंवर कोणताही इन्कम टॅक्स बसत नाही. पण जर आपण आपल्या पालकांकडून मिळालेल्या रक्कमवर गुंतवून कमाई केली असेल, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.

कलम 80G अंतर्गत देणगीवरील वजावट

इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80G नुसार धर्मादाय देणग्या देणाऱ्या व्यक्तींना कर सवलत प्रदान करते.या कायद्यांतर्गत ITR filling करताना एखादी व्यक्ती मान्यताप्राप्त धर्मादाय संस्थेला 100% मर्यादेपर्यंत दान केलेल्या रकमेवर आयकर कपात म्हणून दावा करु शकते.पण आता केवळ 2 लाखांच्या आत रकमेवरच काही सवलती देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment