Close Visit Mhshetkari

PPF Calculator : पीपीएफ चे तुफान रिटर्न ! 5 हजार गुंतवल्यास किती मिळणार पैसे? लक्षात ठेवा 3 गोष्टी; होसाल मालामाल …

PPF Calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते.भारतातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकासह नोकरदार सामान्य नागरिक सुद्धा सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधत आहेत.

Public Provident Fund

सरकारी बँक आणि पोस्ट ऑफिस सुद्धा पीपीएफ योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे सांगत ज्यामध्ये उत्तम व्याज (PPF Interest),टॅक्स फ्री इनव्हेस्टमेंट (Tax free investment), मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे (PPF Maturity) पूर्णपणे आपले असतात.

मित्रांनो पीपीएफ मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तीन पर्याय मिळतात हे तीन पर्याय समजावून घेणे अतिशय महत्त्वाचे असतात पहिला पर्याय म्हणजे पैसे काढून घेणे.दुसरा पर्याय म्हणजे पैसे काढले नाही तरी त्यावर व्याज मिळत राहील आणि तिसरा पर्याय म्हणजे जमा रकमेसाठी 5 वर्षांसाठी एक्स्टेन्शन घेणे.

1) मॅच्युरिटीवर पूर्ण पैसे काढणे

मित्रांनो आपण जर पीएफ खात्यातील पैसे मॅच तर काढून घेतल्यास क्लोजरच्या स्थिती संपूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित होतात.मिळालेले पैसे आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असते.याशिवाय दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सूट मिळते. संपूर्ण कार्यकाळात तुम्ही जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. 

हे पण वाचा ~  Provident Fund : पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! मिळणार वाढीव व्याजदर; जाणून घ्या नवीन व्याजदर व सविस्तर अपडेट्स

2) दर 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढ

दुसऱ्या परिवाराविषयी विचार करायचा झाल्यास मित्रांनो आपण जर पाच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपली जमा रक्कम एक्सटेन्शन करून गुंतवल्यास बक्कळ फायदा होईल.तुम्हाला PPF खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी 1 वर्ष आधी बँक किंवा पोस्ट ऑफिसला यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल.

3) मॅच्युरिटीनंतर विना गुंतवणूक स्कीम वाढ

पीपीएफ खात्यातील तिसरा पर्याय म्हणजे आपले खाते मॅच्युरिटीनंतरही कार्यरत राहते.अशावेळी नव्या गुंतवणुकीची गरज भासणार नाही.आपली मॅच्युरिटी आपोआप 5 वर्षांनी वाढेल. यानंतर 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ दिली जाऊ शकते.

PPF Investment Benefits Calculator

Public Provident Fund (PPF) मध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत.सध्या PPF वर 7.1% व्याज दर आहे.व्याज दर वार्षिक आधारावर दिला जातो, परंतु तिमाही आधारावर निश्चित केला जातो.गेल्या काही काळापासून व्याज दरात बदल झालेला नाही.PPF खाते कमीत कमी रक्कम ₹500 पासून उघडता येते.

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

जर तुम्ही 15 किंवा 20 वर्षांसाठी याच व्याज दरावर गुंतवणूक केली तर मोठा फंड तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला ₹5,000 (वार्षिक ₹60,000) 20 वर्षांसाठी गुंतवले तर खालील प्रकारे परतावा मिळतो.

  • एकूण गुंतवणूक: ₹12,00,000
  • व्याज: ₹14,63,315
  • मॅच्युरिटी रक्कम: ₹26,63,315

Leave a Comment