Investment management : मित्रांनो आजकालच्या जमान्यामध्ये महागाईमुळे आपल्या मुलांची चिंता सगळ्याला असते भविष्याची काळजी वाटू लागल्याने पालक मुलांच्या शिक्षणासाठी व इतर गरजांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक कुठे करावी ? यासाठी पर्याय शोधत असतो.जर आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर मुलांच्या भविष्याची चिंता मिटू शकते. आपण मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो.
आज आपण गुंतवणुकीचे असे दोन पर्याय सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा फक्त ५ हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे काही वर्षांत तुमच्याकडे लाखो रुपये जमा होऊ शकतात.
PPF / सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये दरमहा किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकता.सध्या पीपीएफवर ७.१ % व्याज दिले जात आहे.
दरमहा ५ हजार रुपये देखील गुंतवले तर १५ वर्षांत एकूण ९ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. ७.१ टक्के दराने तुम्हाला एकूण १६ लाख २७ हजार रुपये परतावा मिळेल.
SIP Mutual funds
SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.तज्ज्ञांच्या मतानुसार दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास sip द्वारे सरासरी १२ % परतावा मिळू शकतो.
दरमहा आपण सरासरी ५ हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर आपण सरासरी १२ टक्क्यांचा परतावा मोजला तर १५ वर्षात ९ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. साधारपणे १५ वर्षांनंतर गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजासह तुम्हाला एकूण २५ लाख २२ हजार रुपये मिळतील.
(टीप – सदरील लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी देण्यात आला आहे म्युच्युअल फंड व इतर आर्थिक गुंतवणुकीसाठी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)