Bank savings account : आजच्या युगात श्रीमंत असो की गरीब प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट असणे आवश्यक झाले आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचे अकाउंट असते
कारण सॅलरीपासून ते मजुरी आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये येत असतात. बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी सेव्हिंग, करंट आणि सॅलरी अकाउंटसारखे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.देशातील बहुतांश ट्रांझेक्शन हे बचत खात्यातूनच केले जातात.
पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि इतर कामकाजासाठी प्रत्येकजण बँकेत खाते उघडतो. त्यांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी, पगारासह कोणत्याही क्षेत्रात काम करणार्या कामगारांना कमीतकमी एक बचत खाते असणे गरजेचे असते. बचत बँक खाती सर्वसाधारणपणे उघडली जातात तिथे निश्चित उत्पन्न असते,
Saving Bank Account Cash Limit Rules
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार, कोणत्याही बँक अकाउंटमध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची माहिती देणे बंधनकारक आहे. ही मर्यादा FD, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअर्समधील गुंतवणुकीवर देखील लागू होते.
आता तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरुन मिळणारे व्याज तुमच्या इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या इन्कमशी जोडले जाते आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार एकूण उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागतो.याची कल्पना तुम्हाला असणे गरजेचे आहे.यामुळे तुमच्या खात्यात किती रक्कम असावी याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
देशातील आघाडीच्या सरकारी आणि खाजगी बँक सेव्हिंग अकाउंटवर 2.70 टक्के ते 4 टक्के व्याज देत आहेत. 10 कोटी रुपयांपर्यंत बॅलेन्स असलेल्या सेव्हिंग अकाउंटवर व्याज दर 2.70 टक्के आहे आणि 10 कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी हा दर 3 टक्के आहे. याशिवाय अनेक स्मॉल फायनेंस बँका अटींसह सेव्हिंग अकाउंटवर 7% पर्यंत व्याज देत आहेत.
बँकेचे नवीन नियम 2023
आर्थिक वर्षात कोणत्याही व्यक्तीने किंवा बॅंकेने ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरसाठी रोख रक्कम म्हणून १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला नोटिस मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेने ज्या सुविधेला प्रीपेड इन्स्ट्रूमेंटचा दर्जा दिलेला असेल त्याला विकत घेण्यासाठी एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास इन्कम टॅक्स विभाग त्याची दखल घेऊ शकतो.
असाच नियम करंट अकाउंटसाठीदेखील आहे, मात्र यात ट्रान्झॅक्शनसाठीची मर्यादा ५० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. करंट अकाउंटवर सध्या एका वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येनार नही
ट्रान्झॅक्शन करताना किती रक्कम असावी
अगदी महत्त्वाचे म्हणजे एका ट्रान्झॅक्शनमध्ये २ लाख रुपयांपेक्षा जास्त मोठी रक्कम नसावी आणि वर्षभरातील एकूण ट्रान्झॅक्शनची रक्कम १० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावी. यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास इन्कम टॅक्स विभाग दखल घेऊ शकतो.त्यामुळे आपले वयवहार हे व्यवस्थीत करणे आवश्यक आहे
Nash Ponce