Close Visit Mhshetkari

Loan Against Property : कुठल्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर घ्या प्रॉपर्टी लोन ! आहेत अनेक फायदे ! पहा सविस्तर माहिती…

Loan Against Property : नमस्कार मित्रांनो आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा कोणत्या प्रकारची परिस्थिती उद्घावेल याची माहिती नसते आणि केव्हा मोठ्या प्रमाणावर पैसा लागेल याची सुद्धा शाश्वती नसते.

घरामध्ये लग्न समारंभाचे हॉस्पिटल असेल, व्यवसाय सुरू करणे असेल,आजारपणा असेल किंवा घर बांधणे असेल यासाठी आपल्याला मोठ्या पैशाची आवश्यकता भासत असते.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या या मोठ्या पैशाची गरज भागवण्यासाठी आपण सरळ आधार घेतो तो वैयक्तिक कर्ज म्हणजेच प्रश्न लोनचा. परंतु मित्रांनो आपल्याला माहिती नसेल की पर्सनल लोन ऐवजी जर आपण मालमत्ता कर्ज किंवा प्रॉपर्टी कर्ज घेतले,तर ते सुरक्षित कर्जामध्ये गणले जाते.

आपण जर प्रॉपर्टी कर्ज घेतल्यास आपल्याला अनेक फायदे मिळतात ज्यामध्ये करसुट त्याचबरोबर व्याजदर कर्ज रक्कम अशा असंख्य फायद्यांचा समावेश होतो तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती.

प्रॉपर्टी लोनचे वैशिष्ट्ये

1. कर्जाची रक्कम : प्रॉपर्टीच्या मूल्याच्या 75% पर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्जाची रक्कम तुमच्या गरजेनुसार आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता यावर अवलंबून असेल.

2. व्याज दर : व्याज दर बँकेनुसार आणि कर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकतात.सध्या, प्रॉपर्टी लोनसाठी व्याज दर 8% ते 10% पर्यंत आहेत.

3. कर्जाची मुदत : कर्जाची मुदत 15 ते 30 वर्षांपर्यंत असू शकते.तुमच्या गरजेनुसार आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता यावर मुदत अवलंबून असेल.

हे पण वाचा ~  Loan Against FD : एफडी तोडावी का ? एफडी वरती कर्ज घ्यावे पहा कोणता पर्याय आहे. सोईस्कर जाणून ..

4. फायदे :

  • कमी व्याज दर
  • जास्त कर्जाची रक्कम
  • कर लाभ
  • कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्त मुदत

5. तोटे :

  • मालमत्ता गहाण ठेवणे आवश्यक आहे.
  • कर्जाची परतफेड न केल्यास मालमत्ता जप्त होऊ शकते.
  • प्रक्रिया लांब आणि क्लिष्ट असू शकते.

प्रॉपर्टी लोनचे प्रकार

  • गृहकर्ज
  • टॉप-अप लोन
  • होम इम्प्रूव्हमेंट लोन
  • ओवरड्राफ्ट सुविधा

प्रॉपर्टी लोनसाठी आवश्यक पात्रता

अर्जदाराची पात्रता

  • वय : 18 ते 70 वर्षे
  • व्यवसाय : नोकरी, व्यावसायिक, गैरव्यवसायिक
  • किमान पगार : ₹12,000 प्रति महिना
  • किमान वार्षिक उत्पन्न : ₹1.5 लाख
  • कामाचा अनुभव : सध्याच्या संस्थेमध्ये किमान 1 वर्ष
  • कर्ज रक्कम : जास्तीत जास्त : ₹25 कोटी
  • मालमत्ता मूल्याच्या टक्केवारीत : 75%
  • क्रेडिट स्कोर : साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त
  • मालमत्ता : निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक
प्रॉपर्टी लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड

निवासाचा पुरावा

  • रेशन कार्ड
  • टेलिफोन बिल
  • विज बिल
  • भाडेकरार
  • पासपोर्ट प्रत
  • बँक पासबुक
  • बँकेचे स्टेटमेंट
  • ड्रायव्हिंग लायसन्स

वयाचा पुरावा : पॅन कार्ड,पासपोर्ट,वैधानिक प्राधिकरणाकडून इतर कोणतेही प्रमाणपत्र

उत्पन्न आणि रोजगाराचा पुरावा

  • मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट
  • बँक पासबुक
  • मागील सहा महिन्यांची पगार स्लीप
  • फॉर्म 16
  • तीन वर्षाचे आयकर रिटर्न

इतर कागदपत्रे :- मालमत्तेची कागदपत्रे (खरेदी करार, मालमत्तेचा नकाशा, ७/१२ उतारा, इ.कर्ज स्वीकृती पत्र,इतर कागदपत्रे (बँकेनुसार बदलू शकतात)

Leave a Comment