Provident Fund : आपण आपल्या बचतीसाठी अनेक मार्ग असा अवलंब करत असतो कर्मचाऱ्यांना बचतीसाठी सरकारने PF ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता EPFO संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की बँक खाते असो किंवा एखाद्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यास आपल्याला आपल्या खात्याला वारस नोंद करणे आवश्यक असते.
EPFO new updates
आता ही वारस नोंद ऑनलाईन करणे सुद्धा उपलब्ध झालेली असून भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुद्धा इपीएफ धारकांसाठी नॉमिनी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केलेली आहे तर ही नोंद कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
आपण जर वारसदार घोषित केले नसेल तर ईपीएफोदरे खातेदाराला अनेक योजनांना मुकावे लागू शकते यामध्ये बँक खात्यातील रक्कम किंवा बॅलन्स तपासणी समाविष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास अशावेळी आपल्या खात्यात जमा असलेली रक्कम आपल्या वारसदारास मिळण्यास अडचणी येऊ शकतात मित्रांनो आपण एकापेक्षा अनेक व्यक्तींची सुद्धा वारसदार म्हणून नोंदणी करू शकतो.
तुम्ही EPFO Account online नामांकन करू शकता.PF खातेधारक आणि त्याच्या कुटुंबीयांना पीएफ लाभ देण्यासाठी E Nominee खूप उपयुक्त आहे.पीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यास भविष्य निर्वाह निधी,पेन्शन,विमा लाभांचा ऑनलाईन दावा आणि सेटलमेंट वारस नोंद केल्यावरच शक्य असते.
जर कर्मचार्याने नॉमिनीचा उल्लेख केला नसेल आणि कर्मचार्याचा मृत्यू झाला तर, त्यांच्या वारसांना PF सोडण्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल.
कोणाला नॉमिनी बनवू शकता?
कर्मचारी आपल्या पीएफ खात्यास फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो.एखाद्याला कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो इतर कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो.नॉमिनी बनवल्यानंतर, कुटुंबाचा पत्ता माहीत असल्यास,नातेवाईक नसलेल्या व्यक्तीचे नामांकन रद्द केले जाते.
एक EPF खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनी करू शकतो. एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास,अधिक तपशील द्यावा लागेल. कोणत्या नॉमिनीला किती % रक्कम द्यायची हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल.
ई-नामांकन अनिवार्य
आता भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये आपल्या खात्यास ई नॉमिनेशन करणे अनिवार्य केलेले आहे.आपल्याला जर ऑनलाइन नॉमिनेशन नोंदणी करायची असल्यास आपला युएएन नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपला खात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे सुद्धा अत्यावश्यक आहे.मोबाईलवर ओटीपी द्वारे आपण आपला वारस नोंदणी करू शकतात.