Service Book : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेमधील सेवा पुस्तका अविभाज्य घटक आहे या सेवा पुस्तकाविषयी सर्वसाधारण तरतूद नियम याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्यासाठी लेख सविस्तर आणि शेवटपर्यंत वाचावा
Employee’s Service Book
सेवा पुस्तकाची एक प्रत, तो शासकीय कर्मचारी जेये कामावर असेल तेथील कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षेत ठेवावी आणि ज्या ज्या कार्यालयात तो जाईल तेथे तेथे ती प्रत पाठवावी. दुसरी प्रत,संबंधित शासकीय कर्मचान्याला देण्यात येते.
कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षेत ठेवलेल्या प्रतीमध्ये सर्व नोंदी यथोचितरीत्या करून स्या साक्षांकित केल्या आहेत हे पाहणे, त्याचे कर्तव्य असते.
सेवाभिलेख सुस्थितीत ठेवणे
ज्या राजपत्रित कर्मचान्यांचे बेतन व भत्ते आस्थापनेच्या देयकांवर कार्यालय प्रमुखांकडून काढण्यात येतात त्यांच्याव्यतिरिक्त, प्रत्येक राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याचे सेवाभिलेख लेखापरीक्षा अधिकारी सुस्थितीत ठेवीवी लागतात.
सदरील लेखापरीक्षा अधिकारी नेहमी त्याच्या वेतनाची लेखापरीक्षा करीत असतो किंवा स्वीयेतर सेवेत पाठवलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत स्वीयेतर नियोक्त्याकडून अंशदाने वसूल करण्याबद्दल जबाबदार असतो.
पदावनती, सेवेतून काढून टाकणे नोंद
जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचान्याला, पदावनत केले जाते, सेवेतून काढून टाकले जाते किवा बडतर्फ केले जाते किवा नोकरीतून निलंबित केले जाते, तेव्हा यथास्थिति पदावनत करणे, सेवेतून कावून टाकणे, बडतर्फ करणे किया निलंबित करणे यावद्दलची कारणे नेहमी, “अकार्यक्षमतेबद्दल पदावनत केले “, “आस्थापनेच्या पुनर्रचनेमुळे पदावनत केले ” इत्यादींप्रमाणे थोडक्यात नमूद केली जाते.
वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्रांची नोंद
विभाग प्रमुखाने तसा आदेश दिलेला असल्याखेरीज, वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्त्रांची सेवा पुस्तकात नोंद करू नये.
शासकीय कर्मचायांना सेवा पुस्तके दाखविणे
प्रत्येक कार्यालय प्रमुखाने, त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कर्मचान्यांना दरवर्षी सेवा पस्तके दाखविण्यासंबंधी भाणि त्यांनी सेवा पुस्तके तपासली असल्याचे द्योतक म्हणून त्यांची सही घेण्यासंबंधी कार्यवाही सुरू करणे, हे त्याचे कर्तव्य असेल. मागील वित्तीय वर्षाच्या संबंधात त्याने तसे केले आहे, अशा अर्थाचे प्रमाणपत्र दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस त्याने निकटच्या वरिष्ठ अधिकान्याला सादर केले पाहिजे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी सही करण्यापूर्वी, इतर गोष्टींबरोबरच, त्यांच्या सेवांची यथोचितरीत्या पडताळणी केल्याची आणि तसे प्रमाणित केल्याची खात्ती करून घ्यावी. स्वीयेतर सेवंतील शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, लेखापरीक्षा अधिकाऱ्याने त्या कर्मचान्याच्या स्वीये- तर सेवेसंबंधी आवश्यक त्या नोंदी केल्यानंतर त्याची सेवा पुस्तकात सही घेण्यात येईल.
बदलीनंतर सेवा पुस्तक
जेव्हा अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली होते, तेव्हा बदलीचे स्वरूप आणि कारण याबद्दलची आवश्यक ती नोंद, त्याच्या सेवा पुस्तकात त्याची जेथून वदली झाली त्या कार्यालयात करण्यात आली पाहिजे.त्या कार्यालय प्रमुखाने त्याची उचित रीत्या अद्यावत पडताळणी केल्यानंतर आणि ते साक्षांकित केल्यानंतर ते सेवा पुस्तक, त्याची जेथे बदली झाली तेथील कार्यालय प्रमुखाकडे पाठविले पाहिजे. त्यानंतर ते सेवा पुस्तक त्या कार्यालयात सुस्थितीत ठेवले जाईल.
Service Book verification rule
सेवा पुस्तकांची व सेवा पटांची वार्षिक पडताळणी
प्रत्येक कार्यालयातील सेवा पुस्तके व सेवा पट (पोलीस हवालदार व पोलीस शिपाई यांची बाव वगळून) यांची पडताळणी, प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने करावी.
संबंधित शासकीय कर्मचान्याच्या सेवा, त्याच्या सेवापुस्तकात व सेवा पटात या नियमांनुरूप बरोबर नमूद करण्यात आल्या असल्याबद्दल स्वतःची खाती पटल्यानंतर कार्यालय प्रमुख हा, वेतन देयके, वेतनपट आणि नमूद करण्यात येतो.
तत्सम अभिलेख यांवरून अशा शासकीय कर्मचा-याच्या सेवेची पडताळणी मागील वित्तीय वर्षाच्या अखेरीपर्यंत करण्यात आली आहे, अशा आशयाचे स्वतःच्या सही- निशी एक प्रमाणपत्र सेवा पुस्तकात नोंदवील.
Seva pustaka chi dusri duplicate prat milane babat