Close Visit Mhshetkari

Old pension Committee : जुन्या पेन्शन संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित; आता ‘या ‘ कर्मचाऱ्यांना लागू होणार पेन्शन….

Old Pension Committee : मुख्यमंत्री महोदय, यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २२/०७/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधानपरिषद सदस्य यांनी ऐनवेळचा विषय म्हणून दिनांक १/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दि.१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भाने विषय मांडला आहे.

Old Pension Scheme Committee

सदर विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंकी,तत्कालीन आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखालील “सम्यक विचार समिती” ने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरुन बैठकीस उपस्थित विधानपरिषद सदस्यामार्फत आक्षेप घेण्यात आला होता. 

दिनांक १/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दि.१/११/२००५ नंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबतीत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता समिती गठित करण्याचे निदेश देण्यात आले होते.

हे पण वाचा ~  Old pension news : महाराष्ट्रातील जुनी पेन्शन संपासोबत चालू असलेल्या 'या' अंदोलक कर्मचाऱ्यांना मिळाली जुनी पेन्शन

जुनी पेन्शन तपासणी समिती

आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे तपासणी समिती गठित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.याशिवाय समितीचे अध्यक्ष,आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आवश्यकतेनुसार इतर सदस्यांना निमंत्रित करेल.

समितीची कार्यकक्षा

सदर समितीने पुढील बाबींची तपासणी करुन आपला अहवाल सादर करणार आहे.

सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तींचा प्रत्यक्ष दिनांक,अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या,त्यानूसार सेवानिवृत्तविषयक लाभ अदा करावयाचा असल्यास प्रत्यक्षात येणारा खर्च,संपुर्ण खर्चाचा वर्षनिहाय तपशिल,सेवानिवृत्तविषयक प्रत्येक लाभनिहाय खर्चाचा वर्षनिहाय तपशिल.

समितीचा कार्यकाल

सदर समितीने आपला अहवाल शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ०१ महिन्याच्या आत सादर करावा. सदर समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर समितीचा कार्यकाल आपोआप संपुष्टात येईल.

Leave a Comment