Close Visit Mhshetkari

Medical checkup : सरकारी अधिकारी कर्मचारी वैद्यकीय तपासणी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित ….

Medical checkup : शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांच्या शासन निर्णयान्वये, राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय आहे.

Employees Medical checkup

आता वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत, तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. 

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

हे पण वाचा ~  Employees medical bills : मोठी बातमी... सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!

शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

कर्मचारी वैद्यकीय तपासणी योजना

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहीत कार्यपद्धती निश्चित करण्याची, कारवाई गृह विभागामार्फत करण्यात यावी. तसेच उपरोक्त बाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी लागू राहतील.

सदर शासन निर्णय गृह विभागाची नस्ती क्र. कल्याण ०१२३/प्र.क्र.०४/पोल-७ वर मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०१०५११०८५७६८१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment