Close Visit Mhshetkari

Survey Mandhan : मोठी बातमी ! मराठा संरक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन होणार बँक खात्यात जमा; परिपत्रक निर्गमित …

Survey Mandhan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून करण्यात आले होते.सदरील कामासंदर्भात निश्चित मानधन ठरवण्यात आले होते.

आता हे मानधन संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.तर पाहूया काय आहे? माहिती सविस्तर

Maratha Survey Mandhan

जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी आयोगास कळविले होते.आता सदरील मानधनाची रक्कम जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे.

मराठा सर्वेक्षण केलेल्या पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली होती.त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु. १०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  Arrears and Bonus : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन आले शासन निर्णय ! एकास १० % टक्के वाढ तर एका संवर्गाला मिळणार ५ हजार रुपये ठोक भत्ता ..

सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे लागणार आहे. तसेच काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी, अशी विनंती आ.उ.पाटील (सदस्य सचिव) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी मा. जिल्हाधिकारी (सर्व) व मा.महानगरपालिका आयुक्त (सर्व) यांना केली आहे.

Leave a Comment