Maha eHRMS : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित; आता लागू होणार भौतिक सेवापुस्तक प्रणाली …

Maha eHRMS : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा विषयक बाबींवरील कार्यवाही व प्रक्रियांचे स्वयंचलन करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागामार्फत वित्त विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागांच्या समन्वयाने Maha eHRMS (मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली) मध्ये सुधारणा करून ती नव्याने विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे सेवातंर्गत लाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर व सुलभरित्या देणे शक्य होणार आहे.

State Employees Maha eHRMS update

“महा-आस्था” प्रणाली आता “Maha eHRMS” प्रणाली या नावाने ओळखण्यात येईल.संपूर्ण राज्यात Maha eHRMS प्रणालीची अंमलबजावणी खालीलप्रमाणे “दोन टप्प्यांमध्ये”करण्याचे नियोजित आहे.

प्रथम टप्पा : मंत्रालयीन प्रशासकीय विभाग

या टप्यात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतील अधिकारी/कर्मचा-यांकरिता सदर प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

द्वितीय टप्पा : क्षेत्रिय कार्यालये

प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता सदर प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

Maha eHRMS प्रणाली अंमलबजावणीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या सुचना मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. आता मंत्रालयीन शासकीय कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तकांचे “Digitization” करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

Employee Service Book Digitization

१. संपूर्ण राज्यात Maha eHRMS प्रणाली राबविण्यात येत असून प्रथम टप्प्यात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतील अधिकारी/कर्मचा-यांकरिता सदर प्रणाली लागु करण्यात येत आहे.

२. प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता द्वितीय टप्प्यात सदरहू प्रणाली लागू करण्यात येणार आहे.डिजिटायझेशन प्रक्रियेपुर्वी प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची भौतिक सेवापुस्तके संदर्भाधीन दि.२० जून २०२५ च्या परिपत्रकान्वये आवश्यक / संबंधित आदेशांच्या प्रती/ कागदपत्रांची जोडणी करून अद्ययावत करून तयार ठेवावीत. 

क्षेत्रिय कार्यालयांकरीता डिजिटायझेन संबंधित मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये प्रथम टप्प्यात “Maha eHRMS” प्रणालीच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागातील ४ सह सचिव / उप सचिव, त्यांच्या अधिपत्याखाली सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी (SPOCS) व हेल्प डेस्क हे महत्वपुर्ण भुमिका बजावत आहे.

भौतिक सेवापुस्तक प्रणाली

1. सामान्य प्रशासन विभागाच्या चार सह सचिव / उप सचिव यांची प्रणालीच्या अंमलबजावणीकरीता नियुक्ती करण्यात आली आहे.

॥. मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांची विभागणी उपरोक्त चार सहसचिव / उप सचिव यांच्यात करण्यात आली आहे.

II. वरील सह सचिव / उप सचिव यांच्या अधिपत्याखाली सर्व प्रशासकीय विभागांशी समन्वय साधण्याकरीता प्रशासकीय विभागनिहाय सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा ~  Service Book : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाविषयी सर्वसाधारण नियमावली ! पहा महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम 1981

IV. तसेच विभागनिहाय मदत कक्ष सहाय्यक (Help Desk Support) नेमण्यात आले आहेत.

Maha eHRMS प्रणाली अंमलबजावणी

1. भौतिक सेवापुस्तक अद्ययावत करणे (Updation of Physical Service Book) 

॥. अद्ययावत भौतिक सेवापुस्तकाचे स्कॅनिंग करणे (Scanning of updated Physical Service book),

III. भौतिक सेवापुस्तकांच्या आधारे डिजिटल प्रणालीवर माहितीचा भरणा (Data feeding in the system).

IV. नोडल अधिका-याच्या मार्गदर्शनाखाली आहरण व संवितरण अधिका-यामार्फत प्रमाणिकरण व प्रणालीमध्ये यशस्वी प्रवेश (Authentication and Successful onboarding in the system)

Maha eHRMS प्रणालीच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीमध्ये सुसंगता, एकसमानता, अचुकता व सुरक्षीतता राखण्यासाठी उपरोक्त ४ घटकांच्या अनुषंगाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

भौतिक सेवापुस्तक अद्ययावत करणे (Updation of Physical Service book)

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सह/उप सचिव (eHRMS Cell) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी/कर्मचारी यांचे भौतिक सेवापुस्तक अद्ययावत करावे.

1) भौतिक सेवापुस्तकांचे स्कॅनिंग करणे (Scanning of updated physical service book) :- 

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सर्व अधिकारी / कर्मचारी यांची अद्ययावत भौतिक सेवापुस्तके स्कॅन करून (३०० dpi colour) PDF स्वरूपात नोडल अधिका-याच्या नियंत्रणाखाली आहरण व संवितरण अधिका-यांच्या (DDO) लॉगिनमधून Maha eHRMS प्रणालीवर अपलोड करावी.

2) अद्ययावत सेवापुस्तकातील आदेश, प्रती, स्वाक्षऱ्या इ. स्कॅन (३०० dpi colour) करून PDF स्वरूपात तयार ठेवाव्यात. त्याबाबतच्या सविस्तर सूचना परिशिष्ट-४” मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. (सदर प्रती माहिती भरताना आवश्यक त्या ठिकाणी अपलोड करणे)

3) भौतिक सेवापुस्तकांच्या आधारे दि. ३ नोव्हेंबर, २०२५ पासून डिजिटल प्रणालीवर माहितीचा भरणा करणे (Data feeding in the Maha eHRMS system)

डाटा एन्ट्री करण्यासाठी पुर्व तयारी (Preparatory Instructions and Process of data feeding)

1. प्रशासकीय विभागांच्या सह/उप सचिव (eHRMS Cell) यांनी विभागाच्या आहरण व संवितरण अधिका-यामार्फत (DDO) खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

प्रणालीवर माहितीचा भरणा करण्याकरीता सर्व प्रशासकीय विभागांना ADMIN /DDO लॉगिनचा तपशील (Username & Password) वेगळ्याने कळविण्यात येणार आहे. 

ADMIN / DDO यांनी प्राप्त झालेल्या Username & Password च्या सहाय्याने डाटा एन्ट्री करणा-या मनुष्यबळाकरीता “Data entry Login” ची निर्मिती करावी.

विभागांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळानुसार किमान ३० अधिकारी / कर्मचाऱ्यांमागे १ मनुष्यबळ या प्रमाणात “Data entry Login” ची निर्मिती करावी. त्यानुसार विभाग त्यांच्या आवश्यकतेनुसार Login ची निर्मिती करू शकतात.

Leave a Comment