EPF Rules : सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजे EPF खात्यामध्ये मासिक योगदान जमा करावे लागत असते.सेवानिवृत्तीच्या वेळेस आपले EPF खाते परिपक्व होते.
अशा वेळी योजनेतील बरीच माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना नसते.तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
भविष्य निर्वाह निधी रक्कम आणि व्याज
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचारी असो किंवा खाजगी कंपनीत कर्मचारी असो, त्याला आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते.सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत आपल्या पगारातून दहा टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करतात.
सरकार 14 % योगदान भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करत असते या खात्यावर मिळणाऱ्या जे व्याज असते हे करमुक्त असते तसेच सरकारी कर्मचारी सेवा नृत्य झाल्यानंतर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त असते त्यासाठी काही विशेष अटी सुद्धा असतात याची सुद्धा माहिती आपण खाली बघणार आहोत.
सेवानिवृत्ती नंतर पीएफ खात्यात किती काळ पैसे ठेवू शकता?
एखादा कर्मचारी त्यांच्या पगारातून मासिक योगदान देतो, तेव्हा EPF खाते सक्रिय राहते. तथापि,जर काम सोडले असेल किंवा सेवानिवृत्त झाला असेल तर किती काळ EPF खात्यात पैसे ठेवू शकतो? EPF योजना एखाद्या व्यक्तीला त्यांच्या EPF शिल्लकपैकी १००% काढू देते आणि दोन महिन्यांच्या आत दुसर्या नोकरीत रुजू न झाल्यास खाते बंद करू देते.कर्मचारी सेवानिवृत्तीवेळी EPF बंद केला जाऊ शकतो.
दि.२४ जुलै २०१७ रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, “सरकारने ११ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, ईपीएफ खाते निष्क्रिय खाते बनण्याच्या अटींबाबत EPF योजनेत सुधारणा केलेली आहे.
EPF new updates 2023
‘निष्क्रिय खाते’ च्या सुधारित व्याख्येनुसार एखादे खाते ५८ वर्षांच्या वयानंतर म्हणजे ५५ वर्षांच्या निवृत्तीच्या वयाच्या ३६ महिन्यांनंतर निष्क्रिय होत असते.जर एखादा कर्मचारी ५६ किंवा ५७ वर्षाला सेवानिवृत्त झाला तर त्याचे वय ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत EPF खाते कार्यरत राहते.
- आपले ईपीएफ खाते निष्क्रिय होण्यापूर्वी EPF खात्यातील पैसे निवृत्तीच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंत तसेच राहू शकतात. परंतु वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होत असाल आणि EPF खात्यात मासिक योगदान न मिळाल्यास खाते निष्क्रिय होईल.
- कर्मचाऱ्यांने जर सेवानिवृत्तीपूर्वी काम करणे थांबवले असेल तर EPF खाते ज्या महिन्यामध्ये EPF खात्यातील योगदान थांबवलेल्या महिन्यापासून ते तीन वर्षे कार्यरत राहते. सेवानिवृत्तीचे वय काहीही असो EPF खाते निष्क्रिय होते.
- EPF योजनेच्या नियमानुसार, जर एखादा सदस्य ५५ वर्षे वय पूर्ण केल्यानंतर सेवेतून निवृत्त झाला किंवा त्याने कायमस्वरूपी परदेशात स्थलांतर केले असेल आणि ३६ महिन्यांच्या आत पैसे काढण्यासाठी कोणताही अर्ज केला नसेल तेव्हा ते खाते निष्क्रिय होईल.
- नोकरी बंद झाल्यापासून ३ वर्षांच्या आत EPF खात्यातील पैसे काढले नाहीत तर ते खाते निष्क्रिय होते आणि निष्क्रिय खात्यांमध्ये ७ वर्षांच्या कालावधीसाठी हक्क न मिळालेल्या खात्यांमध्ये पडलेली रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केली जाते.
- कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये हस्तांतरित केल्यानंतर रक्कम अजूनही शिल्लक राहिल्यास हस्तांतरणाच्या तारखेपासून २५ वर्षे हक्क नसलेले राहिल्यास केंद्र सरकारकडे ही रक्कम जाईल.