Close Visit Mhshetkari

LIC Saral Pension scheme:सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा, मिळवा तब्बल ५० हजारांचं पेन्शन;

LIC Investment: पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळानं  अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देतात. अशीच एक योजना म्हणजे  सरल पेन्शन योजना. पॉलिसीधारकानं एकरकमी पैसे भरल्यानंतर उपलब्ध २ पर्यायांमधून वार्षिक प्रकार निवडण्याचा पर्याय आहे. पॉलिसीच्या प्रारंभापासून वार्षिकी दरांची हमी दिली जाते.

कधी मिळणार पेन्शन  

या योजनेत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. मासिक पेन्शन किमान १०००रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान ३००० रुपये, सहामाही पेन्शन किमान ६००० रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान १२,००० रुपये आहे. विशेष म्हणजे पेन्शनच्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

उदाहरणार्थ तुमचे वय ४२वर्ष आहेत आणि तुम्ही ३० लाख रुपयांची ॲन्युइटी खरेदी करत असाल तर तुम्हाला १२,३८८ रुपये मासिक पेन्शन मिळेल. आता तुम्हाला पेन्शनमध्ये जास्त रक्कम मिळवायची असेल, तर त्यानुसार तुम्ही जास्त रकमेचा एकरकमी प्रीमियम जमा करू शकता.

सरल पेन्शन योजना

 • यामध्ये पॉलिसी घेताना प्रीमियम एकदाच भरावा लागतो.
 • यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील.
 • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, एकल प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते.
 • सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, म्हणजेच तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते.
 • ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते, तेवढीच रक्कम आयुष्यभर मिळते.
हे पण वाचा ~  Lic pension scheme: एलआयसी जबरदस्त स्किम फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळणार पेन्शन ?घ्या जाणुन माहिती

गुंतवणूक किती कराल?

या योजनेनेच आणखी एक वैशिष्ट म्हणजे तुम्हाला जर दर महिन्याला पेन्शन नको असल्यास तुम्ही दर तीन महिन्याला, सहा महिन्याला आणि वार्षिक आधारावर देखील या पेन्शचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये समजा एखाद्या व्यक्तीचे वय हे 42 वर्ष असेल आणि संबंधित व्यक्तीने जर सरल पेन्शन योजनेमध्ये 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला 12,388 रुपयांची पेन्शन मिळू शकते.

LIC सरल पेंशन पात्रता –

 1. LIC सरल पेंशन योजनेसाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
 2. LIC सरल पेंशन योजनेसाठी कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे.
 3. 3)LIC सरल पेंशन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे 40 ते 80 वर्षे या दरम्यान असावे. तेव्हाच आपल्याला या योजनेत गुंतवणूक करता येते.
 4. LIC सरल पेंशन योजना फायदे –
 5. LIC सरल पेंशन योजनेमध्ये पॉलिसी सुरू केल्यानंतर पुढे आयुष्यभर पेंशन मिळत राहते.
 6. LIC सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
 7. पॉलिसी सुरू केल्यानंतर जर पॉलिसी धारकाला पैशांची गरज लागली तर 6 महिने झाल्यावर लोन काढता येते.
 8. आणि व्याजाची रक्कम ही मिळणाऱ्या 
 9. पेंशन मधून कपात करण्यात येते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment