Electric Bike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक बाइक व वाहनांची मागणी वाढत आहे. अशातच आता वेगवेगळ्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाईक आणि फोर व्हीलर बाजारात आणत आहेत.
आज आपण नवीन इलेक्ट्रिक बाइक विषयी माहिती बघणार आहोत. नुकतीच गोगोरो क्रॉसओव्हर कंपनीने लॉन्च केलेली असून ग्रामीण व शहरी भागासाठी उपयुक्त अशी बाईक आहे.
New Electric Bike
गोगोरो क्रॉसओव्हरची ( Electric Bike) डिझाईन वेगळी असून यामध्ये स्टीलची फ्रेमचा वापर करण्यात आलेला आहे.ऑफ रोड वापरण्यासाठी उपयुक्त आहे. या बाईचा प्रवासाचा जर विचार करायचा झाला, तर सिंगल चार्ज मध्ये 150 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते आणि ताशी वेग जर बघायचा झाला तर 60 ते 70 किमी सांगण्यात येत आहे.
बाईकमध्ये दोन प्रकार आहेत :- क्रॉसओव्हर आणि क्रॉसओव्हर एस. क्रॉसओव्हरमध्ये ७.० kW पावर आहे, तर क्रॉसओव्हर एसमध्ये ७.६ kW पावर आहे.
बाईकमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यात एलईडी हेडलाईट, रिमूव्हेबल स्प्लिट पॅसेंजर सीट आणि लगेज रेक यांचा समावेश आहे
गोगोरो क्रॉसओव्हर बाईकची वैशिष्ट्ये
- स्टीलचा फ्रेम
- 60 ते 70 KM प्रतितासची गती
- एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 150 km पर्यंतची रेंज
- 7.0 KW ते 7.6 KW Power
- एलईडी हेडलाईट
- रिमूव्हेबल स्प्लिट पॅसेंजर सीट
- लगेज रेक