Close Visit Mhshetkari

8th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग स्थापन करणार का? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

8th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी वेळोवेळी वेतन आयोग स्थापन करण्यात येतो. साधारणपणे निवडणुकीच्या पूर्वी नवीन वेतन आयोगाची स्थापना करून वेतन आयोगाच्या हालचालींना वेग येतो.

अशा वेळेस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार आठवा वेतन आयोगाची स्थापना करणार का ? लोकसभेत या संदर्भात सरकारने काय स्पष्टीकरण दिले याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

आठवा वेतन आयोग अपडेट्स

मित्रांनो निवडणुकीच्या तयारीला लागताना सर्वच पक्ष वेगवेगळ्या योजना आखत असतात.गरीब शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर सर्वांनाच खुश करण्यासाठी सरकार वेगवेगळे योजना आखत असते.आता पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वित्त विभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन यांनी याबाबत माहिती दिली आहे. ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांसाठी ८ वा वेतन आयोग स्थापन करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही. हे वक्तव्य वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांनी केले आहे. 

हे पण वाचा ~  Central employees : खुशखबर.. या सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सह ऑगस्ट - सप्टेंबर महिन्याचे आगाऊ वेतन मिळणार!

Centrel employees news

केंद्र सरकार वेतन आयोग स्थापन करून त्याच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेत असते केंद्र सरकारचे कर्मचारी सशस्त्र सीमा बद्दल कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती धारकांना आकर्षित करण्याचा हा प्रभावी मार्ग असतो त्याचबरोबर वाढत्या महागाई मधून कर्मचाऱ्यांना त्यातून दिलासा मिळत असतो. 

सप्टेंबर २०१३ मध्ये, काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काही महिने आधी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ७ वा वेतन आयोग स्थापन केला.

आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असल्याने, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता, ८ व्या वेतन आयोगाची घोषणा आणि अधिसूचित करण्यासाठी अर्थ मंत्रालयावर राजकीय दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे. 

Leave a Comment