Close Visit Mhshetkari

Electric Vehicle Subsidy : मोठी बातमी… आता इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी संपणार?

Electric Vehicle Subsidy : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अक्ख जग चिंतेत आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे ग्रीन एनर्जी शोधण्यासह इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी व खरेदीसाठी सगळेच जग प्रोत्साहन देत आहे. 

भारतातही इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला सरकारकडून प्रोत्साहन पर सबसिडी देत आहे.

Electric Vehicle Subsidy 2024

अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून एथर एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी इलेक्ट्रिक वाहनाच्या सबसिडी संदर्भात महत्त्वाचे भाष्य केले आहे.

तरुण मेहता यांनी केलेल्या वक्तव्यानुसार इलेक्ट्रिक वाहनावरील सबसिडी सरकार संपवणार आहे.साधारणपणे एप्रिल पासून इलेक्ट्रिक टू व्हीलर फोर व्हीलर विक्रीवरील सरकारी सबसिडी संपुष्टात आहे.ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील कंपन्यांना कठोर परिश्रमाला सामोरे जावे लागत आहे.

सदरील निर्णयाचा हा फटका महान उद्योगाच्या उत्पादकतेवर होणारा असून एक दोन वर्षात व्यवसाय स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे इलेक्ट्रिक वाहन उद्योग आता पूर्णपणे सबसिडीवर अवलंबून राहिलेला नाही.परंतु एप्रिलमध्ये सबसिडी संपल्याने हा व्यवसाय एक किंवा दोन वर्षे ठप्प होऊ शकतो.

हे पण वाचा ~  Electric vehicle : आता इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी होणार स्वस्त आणि टिकाऊ; MIT ला मोठे यश ..

इलेक्ट्रिक वाहन अनुदानात कपात !

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, केंद्र सरकार फास्टर अॅडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME-II) योजनेअंतर्गत दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीवर प्रोत्साहन देते.

सदरील सबसिडीचा कालावधी मार्च 2024 रोजी संपणार आहे मागील वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुधाची वर अनुदानाची रक्कम 15 रुपये प्रतिक किलोवॅट वरून 10 हजार रुपये प्रति किलोवाट केली होती.

अनुदान वाढवणार का?

इलेक्ट्रिक वाहनाच्या सबसिडी आणि कर सवलतीच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अनेक वर्षांच्या भांडवली गुंतवणुकीनंतर, ईव्ही उद्योगात वाढ झाली आहे.

आता अनुदान योजनेचा विस्तार आणि बजेट मधील वस्तू आणि सेवा करांमध्ये कपात व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरिक त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन उद्योजकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment