HRA Allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित असेल की नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे. आता 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिली जाऊ शकते.थोडक्यात महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 % दराने महागाई भत्ता दिला जाईल.
मित्रांनो मागे भत्ता वाढल्यामुळे आणखी एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात वाढ होणार आहे. तर काय आहे. बातमी पाहूया सविस्तर
घरभाडे भत्ता वाढणार ?
महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या तोंडावर मोठे गिफ्ट मिळणार असून पगारात भली मोठी वाढ होणार आहे.ज्यामध्ये महागाई भत्त्या बरोबर घर भाडे,भत्ता याचा सुद्धा समावेश होणार आहे.
मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला महागाई भत्ता बरोबर घरभाडे भत्ता सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते. या अगोदर जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता, तेव्हा घरभाडे भत्त्यात वाढवून तो 8 % दराने देण्यात येत आहे.
आता जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल तेव्हा HRA मध्ये देखील सुधारणा केली जाईल.साधारणपणे घरभाडे भत्त्यात पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे.
HRA hike calculator
मित्रांनो घर भाडे भत्त्याचा विचार करायचा झाला तर सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता 50 टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी,50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने घर भाडे भत्ता मिळत असून तो आता 30 % दराने मिळेल.
शहराची लोकसंख्या 5 लाख ते 50 लाख असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % दराने घर भाडे भत्ता मिळतो आहे. आता त्याच्यामध्ये वाढ होऊन 20 % दराने घर भाडे भत्ता मिळेल.
शेवटी कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी असते,अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो आहे. अशा कर्मचाऱ्यांना आता 10 % दराने HRA मिळणार आहे.