Extra Increment : आनंदाची बातमी …. आता या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित…

Extra Increment : आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते, असे सर्व जिल्हा परिषदांना दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे.

परंतु अशा गट – क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना आगाऊ स्वरूपात वेतन वाढ देण्यासंदर्भात शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेला आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! 

शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक (बाळासाहेब पवार साहेब) औरंगाबाद विभाग, यांच्याकडून. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद,छ. संभाजीनगर, जालना, बौड, परभणी, हिंगोली यांना आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प.शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तातडीने देणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन आदेश क्र.लो आप्र. २००२/प्र क्र.६३/आस्था-५ मंत्रालय मुंबई दि. ०३.१०.२०२३ व ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र माअऊ प्र.क्र.३५३ , आस्था-४ दि.०५.०९.२०२३ नुसार शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून कळविण्यात आली आहे की, मा.आमदार श्री, विक्रम वसंतराव काळे यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तालडोन देने बाबत चे दि. १२.१२.२०२३ या रोजी चे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.

हे पण वाचा ~  7th pay commission : खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी मिळणार! शासन निर्णय निर्गमित

सदर प्रकरण आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने पत्राच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करावी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधितास आपल्या स्तरावरून अवगत करावी,अशी नोंद सदरील परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.

Leave a Comment