Close Visit Mhshetkari

IN come tax: इन्कम टॅक्स वाचविण्याच्या नादात ही तर चूक करत नाही ना

Income tax Investment: प्रत्येक जण आपल्या कमाईतील काही ना काही भाग वाचवून गुंतवणूक  करत असतो. ही गुंतवणूक निरनिराळी असू शकते. एफडीमध्ये, म्युच्युअल फंड  आणि इन्शूरन्स , इक्विटीसारखे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. काही लोक टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करतात, तर काही लोक बचतीसाठी गुंतवणूक करतात. जर तुम्ही केवळ टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला याचं नुकसानही जाणून घेणं आवश्यक आहे.आपण आज टॅक्स सेव्हिंग स्कीम्समधील त्या त्रुटींबद्दल जाणून घेऊ ज्या तुम्हाला माहित असणं महत्त्वाचं आहे.

 निश्चित टार्गेट करावं

करदात्यांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या टारगेटचा विचार केला पाहिजे. त्यांना फक्त कर वाचवायचा आहे की, कर वाचवण्याबरोबरच चांगले रिटर्न्ससुद्धा मिळवायचे आहेत, याबाबत विचार केला पाहिजे. अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे तुमचा कर वाचतो पण, त्यातून फार चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. बँक एफडी हे याचं उत्तम उदाहरण आहे.

बँक एफडी गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. मात्र, त्यावर फार जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. सध्या रेपो दरात वाढ झाल्यानं बँकांनी एफडीमधील रिटर्न्समध्येही वाढ केली आहे

टॅक्स सेव्हिंगअटींसह करावे

इन्स्ट्रूमेंटकर वाचवण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. पण फक्त कर वाचवण्यासाठी गुंतवणूक केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. फक्त कर बचत योजनांवर लक्ष केंद्रित करून, तुम्ही कर वाचवू शकता, परंतु तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही. याच्या तोट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कर बचतीच्या तीन त्रुटींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
तुम्ही फक्त कर बचत करण्याच्या उद्देशानं कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही गुंतवणुकीसाठी निवडलेलं साधन किंवा योजना अनेक अटी आणि लॉक-इन कालावधीसह येतं.

हे पण वाचा ~  Income Tax Return : इन्कम टॅक्स भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळणार? जाणून घ्या नवीन नियम व अटी

गुंतवणुकीवर पर्याय निवडावा

 वरिष्ट नागरिकांच्या गुंतवणूक योजना.  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणुकीवर कोणताही कर आकारला जात नाही. असे पर्याय कर सवलत देण्यात आले आहे ईएलएसएस, एनपीएस, यूलिप, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससी हे अतिशय आकर्षक गुंतवणूक पर्याय आहेत. येथे तुम्हाला करबचतीसोबतच चांगले रिटर्न्सदेखील मिळतात. ईएलएसएसचा मॅच्युरिटी कालावधी फक्त तीन वर्षांचा आहे. त्यामुळे यात तुमचे पैसे फार काळ अडकत नाहीत.मात्र, यातून मिळणारे रिटर्न्स निश्चित नसतात. टॅक्स सेव्हिंग, रिटर्न आणि पेन्शन फंडाच्यादृष्टीनं पाहिले तर राष्ट्रीय पेन्शन योजना  ही सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. या योजनेत निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करावी लागते. या योजनेतील गुंतवणूक आणि रिटर्न दोन्ही करमुक्त आहेत.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment