Close Visit Mhshetkari

HRA hike : मोठी खुशखबर … महागाई भत्ता वाढला आता HRA ही वाढणार! किती वाढणार घरभाडे भत्ता; केव्हा होणार निर्णय ?

HRA hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2023 पासून वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 % एवढा Dearnees Allowance दिला जात होता. सध्या 4% वाढ करण्यात आली आहे.थोडक्यात आता महागाई भत्ता 46 % एवढा झाला आहे.

घरभाडे भत्ता वाढणार ?

आता महागाई भत्ता चार टक्के वाढल्यानंतर घरभाडे भत्ता म्हणजेच HRA देखील वाढवला जाणार आहे. Home rent allowance 3% पर्यंत वाढवला जाण्याचे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा ज्यावेळी महागाई भत्ता 50% होईल त्यावेळी HRA वाढवला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 % एवढा मिळत आहे.

आता जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढ होणार असे सांगितले जात आहे. थोडक्यात नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार हे निश्चित आहे. अशा वेळी HRA देखील वर्षी सुधारणा केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा ~  7th pay da hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर!लवकरच होणार ....

HRA hike calculator

यापूर्वी 2021 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 25 % च्या पुढे गेला होता तेव्हा केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती.

  • 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने, 
  • 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 %
  • जेथे 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.

Leave a Comment